उन्हाळ्याच्या तडाख्याने उल्हासनगरकरांच्या अंगाची लाहीलाही; नागरिक त्रस्त, पालिकेकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा

सकाळी ढगाळ, दुपारी प्रखर ऊन, आणि संध्याकाळी परत थोडा गारवा असा उल्हासनगर शहरात सध्या हवामानाचा ‘हंगामी तमाशा’ सुरू असून, नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
उन्हाळ्याच्या तडाख्याने उल्हासनगरकरांच्या अंगाची लाहीलाही; नागरिक त्रस्त, पालिकेकडून
ठोस उपाययोजनांची अपेक्षा
Published on

उल्हासनगर : सकाळी ढगाळ, दुपारी प्रखर ऊन, आणि संध्याकाळी परत थोडा गारवा असा उल्हासनगर शहरात सध्या हवामानाचा ‘हंगामी तमाशा’ सुरू असून, नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. ऊन आणि सावलीच्या लपाछपीत शहराची दिनचर्या कोलमडली आहे. बाजारपेठा ओस पडू लागल्या आहेत, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्ग त्रासून गेले आहेत, आणि वीज खंडित होण्याच्या प्रकारांमुळे त्रास अधिकच वाढत आहे. उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की, सकाळी घरातून निघाल्यावर संध्याकाळीच घर गाठावे लागत असण्याची वेळ आली आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने जवळपास ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून, शहरात उन्हाचा चटका दिवसेंदिवस तीव्र होतो आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांची जीवनशैलीच बदलून गेली आहे. नागरिक दुपारी घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना टॉवेल, टोपी आणि सनग्लासेसचा आधार घ्यावा लागत आहे. शहरातील काही भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी विजेचा लपंडाव सुरू असल्याने घरांतील पंखे, कुलर, एसी बंद पडतात आणि नागरिक अक्षरशः घामाघूम होतात. यामुळे वृद्ध, लहान मुले आणि रुग्णांवर विशेष परिणाम होत आहे.

उन्हाळा अजून काही आठवडे कायम राहणार असल्याने नागरिकांनी वैयक्तिक खबरदारी घेणे आणि प्रशासनाने तत्काळ सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सावली शोधणाऱ्या नागरिकांसाठी आता ‘सावली’ ही देखील संसाधन वाटू लागली आहे. शहरातील वाढत्या तापमानाचा विचार करता उल्हासनगर महानगरपालिकेने तातडीने सावलीसाठी सार्वजनिक शेड्स, पाणपोई आणि रस्त्यांवर थंड पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याशिवाय प्रमुख चौकात मेडिकल मदत केंद्रे उभारण्याचीही गरज आहे, अशी मागणी सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in