पाणी कपातीतून आठवड्याचा दिलासा! एमआयडीसीचा २७ नोव्हेंबरचे नियोजित शटडाऊन रद्द

दर आठवड्याला होणाऱ्या पाणी कपातीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दिलासा दिला आहे. येत्या २७ नोव्हेंबर रोजीचा नियोजित २४ तासांचा शटडाऊन रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या आठवड्यात पाणीपुरवठा नियमित राहणार असून, मात्र पुढील आठवड्यापासून पुन्हा पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.
पाणी कपातीतून आठवड्याचा दिलासा! एमआयडीसीचा २७ नोव्हेंबरचे नियोजित शटडाऊन रद्द
पाणी कपातीतून आठवड्याचा दिलासा! एमआयडीसीचा २७ नोव्हेंबरचे नियोजित शटडाऊन रद्द
Published on: 

उल्हासनगर : दर आठवड्याला होणाऱ्या पाणी कपातीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दिलासा दिला आहे. येत्या २७ नोव्हेंबर रोजीचा नियोजित २४ तासांचा शटडाऊन रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या आठवड्यात पाणीपुरवठा नियमित राहणार असून, मात्र पुढील आठवड्यापासून पुन्हा पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत एमआयडीसीने अधिकृत सूचना जारी केली आहे.

आगामी वर्षातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. बारवी धरणातील उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजन करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा दर गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्यात येतो. मात्र, यावेळी २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून २७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतचा नियोजित शटडाऊन रद्द करण्यात आला आहे.

पुढील शटडाऊन ३ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत राहणार आहे. त्यानंतर दर आठवड्याला पाणी कपात कायम राहणार असून, संबंधित महानगरपालिका, ग्रामपंचायती आणि उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन एमआयडीसीने केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)