उल्हासनगर मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख आणि त्यांच्या पुतण्याला जीवे मारण्याचे धमकीपत्र

विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू
उल्हासनगर मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख आणि त्यांच्या पुतण्याला जीवे मारण्याचे धमकीपत्र

उल्हासनगर मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख आणि त्यांच्या पुतण्याला जीवे ठार मारण्याच्या धमकीचे पत्र कार्यालयात मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर ४ च्या लालचक्की चौकात मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. रविवारी रात्री ऑफिस बंद झाल्याने काही अज्ञात व्यक्तीकडून हे धमकीचे पत्र कार्यालयात ठेवण्यात आले. या पत्रात थेट बंडू देशमुख आणि तन्मेष देशमुख यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. "तू आणि तन्मेष हिशोबात राहा नाही तर दोघांना संपून टाकू ,जास्त मस्ती आली आहे. तुम्हाला खास करून त्या तन्मेषला समजून ठेवा" असं उल्लेख या पत्रात केला आहे. आता याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in