उल्हासनगर पालिकेची प्लास्टिक विरोधात धडक कारवाई सुरु

२४ जणांकडून तब्बल १ लाख ३० हजार रुपयांची दंडात्मक रकमेची वसूली करण्यात आली
उल्हासनगर पालिकेची प्लास्टिक विरोधात धडक कारवाई सुरु

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि उल्हासनगर पालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशान्वये पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर व विक्री करणाऱ्या दुकानदारांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अचानक छापा टाकून करण्यात आलेल्या या कारवाईत २४ जणांकडून तब्बल १ लाख ३० हजार रुपयांची दंडात्मक रकमेची वसूली करण्यात आली आहे.

ही कारवाई अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या उपस्थितीत उप-आयुक्त डॉ. सुभाष जाधव, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनिष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, स्वच्छता निरीक्षकांनी केली आहे. या कारवाईत सव्वा तीनशे किलोच्या वर प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सिंगल युज प्लॅस्टिक, नॉन वोवन पॉली प्रोपोलिन, प्लॅस्टिक बॅग, पिशव्या व सजावटीसाठीचे थर्माकोल यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

प्रथम वापरास ५ हजार, दुसऱ्या वापरात १० हजार आणि तिसऱ्यांदा वापर आढळल्यास २५ हजार रुपये दंडात्मक रकमेची तरतूद आहे. याचा वापर आढळून आल्यास किंबहूना हितचिंतकांनी तशी माहिती दिल्यास आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशान्वये संबंधित कारखाने व दुकानदार यांच्यावर छापेमारी करून दंडात्मक रकमेची वसुली करण्यात येणार असा इशारा अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in