उल्हासनगरात रक्तरंजित राडा; कलानी समर्थकावर हल्ला; मंदिर परिसरात खळबळ

उल्हासनगर कॅम्प २ मधील ढोलूराम मंदिर परिसरात टीम ओमी कलानीच्या कट्टर समर्थकावर झालेल्या चाकू हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे. केवळ गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद पेटला आणि पाहता पाहता रक्तरंजित हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
उल्हासनगरात रक्तरंजित राडा; कलानी समर्थकावर हल्ला; मंदिर परिसरात खळबळ
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प २ मधील ढोलूराम मंदिर परिसरात टीम ओमी कलानीच्या कट्टर समर्थकावर झालेल्या चाकू हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे. केवळ गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद पेटला आणि पाहता पाहता रक्तरंजित हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

उल्हासनगर कॅम्प २ मधील ढोलूराम मंदिर परिसरात टीम ओमी कलानीचे कट्टर समर्थक जयकिशन आलमचंदानी उर्फ जॅकी यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कारचा कट लागल्यापासून सुरू झालेला वाद’ क्षणात रौद्ररूप धारण करत हल्ल्यात परिवर्तित झाला.

दुपारी साडेचारच्या सुमारास आलमचंदानी हे ढोलूराम दरबार परिसरातून आपल्या बर्गमन मोटरसायकलवरून जात होते. याच वेळी समोरून आलेल्या कारमधून दोन व्यक्ती उतरले आणि मोटरसायकलला कट मारल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. अल्पावधीतच वाद हातघाईपर्यंत पोहोचला.

ओमी कलानीचे कट्टर समर्थक जयकिशन आलमचंदानी उर्फ जॅकी यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ओमी कलानीचे कट्टर समर्थक जयकिशन आलमचंदानी उर्फ जॅकी यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कारमधील एका व्यक्तीने जवळील धारदार शस्त्र काढत आलमचंदानी यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. पोटावर दोन आणि पाठीवर एक असा एकूण तीन वार झाल्याने ते जखमी झाले. नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तानाजीनगरात मारहाण; हल्लेखोराला अटक

दुसरीकडे, उल्हासनगर कॅम्प ५ मधील तानाजी नगरात सराईत गुंडांनी केलेल्या हल्ल्याने परिसरातील नागरिक दहशतीखाली होते. मात्र हिललाईन पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अखेर मुख्य आरोपी अडकला आहे. उल्हासनगरातील तानाजीनगर परिसरात घडलेल्या धक्कादायक हल्ल्याने उल्हासनगर पुन्हा हादरले आहे.

तानाजीनगरात मारहाण; हल्लेखोराला  अटक
तानाजीनगरात मारहाण; हल्लेखोराला अटक

सराईत गुंड साहिल मैराळे आणि पवन लबाना या दोघांनी रस्त्यात अडवून मोहम्मद अन्सारी यांना चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. धमकावत त्यांच्या खिशातून रोकड लुटल्याची तक्रार हिललाईन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. घटनेनंतर दोन्ही आरोपी पळ काढत फरार झाले. पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली हिललाईन पोलिसांनी गुन्ह्याचा तपास वेगात सुरू ठेवत आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. शेवटी गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात साहिल मैराळेला अटक करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in