उल्हासनगर : पीटी शिक्षकाने केला दुसरीतील विद्यार्थिनीचा विनयभंग, पोलिसांनी अंबरनाथमधून केली अटक

एका नामांकित शाळेतील पीटी शिक्षकाने सात वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
उल्हासनगर : पीटी शिक्षकाने केला दुसरीतील विद्यार्थिनीचा विनयभंग, पोलिसांनी अंबरनाथमधून केली अटक
Published on

उल्हासनगर : शहरातील एका नामांकित शाळेतील पीटी शिक्षकाने सात वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी शिक्षकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून शिक्षकाला अटक केली आहे.

उल्हासनगरमध्ये राहणारी सात वर्षाची चिमुकली इयत्ता दुसरीमध्ये शिकते. शुक्रवारी सकाळी तिने शाळेत जाण्यास नकार दिल्यावर तिला आईने जवळ घेत कारण विचारले. तेव्हा पीटी शिक्षकाने अश्लील भाषेचा वापर करत धमकावले असल्याचे तिने आईला सांगितले. तसेच या मुलीकडून मनात लाज उत्पन्न होईल असे कृत्य करण्यास सांगून तिचा विनयभंग केला.

ही बाब तात्काळ आईने शाळा गाठून शाळेच्या मुख्याध्यापिकेला सांगितली. त्यानंतर लगेचच शाळा व्यवस्थापनाने हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्याशी संपर्क करत संपूर्ण प्रकार त्यांच्या कानावर टाकला. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पीटी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर शिक्षकाला अंबरनाथ येथील राहत्या घरातून अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in