Ulhasnagar : महापालिकेतील सत्तासंघर्ष थेट पोलिसांच्या दारात; शिवसेना-भाजपच्या दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

उल्हासनगरातील शिवसेना-भाजपचा सत्तासंघर्ष आता सभागृहातील आरोप-प्रत्यारोप, सोशल मीडियावरील धमक्या आणि राड्यानंतर थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे.
महापालिकेतील सत्तासंघर्ष थेट पोलिसांच्या दारात; शिवसेना-भाजपच्या दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल
महापालिकेतील सत्तासंघर्ष थेट पोलिसांच्या दारात; शिवसेना-भाजपच्या दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल
Published on: 

उल्हासनगर : उल्हासनगरातील शिवसेना-भाजपचा सत्तासंघर्ष आता सभागृहातील आरोप-प्रत्यारोप, सोशल मीडियावरील धमक्या आणि राड्यानंतर थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम आणि त्यांच्या ३० ते ४० समर्थकांवर अश्लील घोषणाबाजी व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला, तर निकम यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून भाजपच्या सहा पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा नोंदवला आहे.

उल्हासनगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून पेटलेला शिवसेना-भाजप वाद आरोप-प्रत्यारोप आणि सोशल मीडियावरील आव्हानानंतर आता परस्परविरोधी गुन्ह्यांपर्यंत पोहोचला आहे.

भाजपच्या नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती दीपा पंजाबी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कमलेश निकम आणि त्यांच्या ३० ते ४० समर्थकांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवणे, पंजाबी यांचा मुलगा अविनाश याच्या विरोधात अश्लील घोषणाबाजी व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेतील सत्तासंघर्ष थेट पोलिसांच्या दारात; शिवसेना-भाजपच्या दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल
महापालिकेतील सत्तासंघर्ष थेट पोलिसांच्या दारात; शिवसेना-भाजपच्या दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

त्याचवेळी कमलेश निकम यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भाजप पदाधिकारी मनीष हिंगोरानी, कपिल अडसूळ, अविनाश पंजाबी, गौरव भालेराव, राकेश पाठक आणि प्रदीप रामचंदानी यांच्याविरुद्ध जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आणि अश्लील शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे.

स्वीकृत नगरसेवक निवडीवरून सुरू झालेल्या संघर्षात कमलेश निकम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर वाद अधिक चिघळला.

महापालिकेतील सत्तासंघर्ष थेट पोलिसांच्या दारात; शिवसेना-भाजपच्या दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल
महापालिकेतील सत्तासंघर्ष थेट पोलिसांच्या दारात; शिवसेना-भाजपच्या दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

कायदेशीर लढाई सुरू

पालिका मुख्यालयातील घोषणाबाजी आणि समाजमाध्यमांवरील धमक्यांच्या आरोपांनी संघर्षाला वेगळे वळण मिळाले. दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात पोलिसांत धाव घेतल्याने राजकीय कुरघोड्यांचे रूपांतर आता कायदेशीर लढाईत झाले असून दोन्ही गुन्ह्यांचा पोलीस तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in