जावयाने केला सासू-सासरे आणि मेहुण्यावर हल्ला

उल्हासनगर कॅम्प न ४ भागातील भरत नगर परिसरात जावयाने सासू-सासरे आणि मेहुण्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जावयाने केला सासू-सासरे आणि मेहुण्यावर हल्ला
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प न ४ भागातील भरत नगर परिसरात जावयाने सासू-सासरे आणि मेहुण्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रेखा गावडे, चिदानंद गावडे आणि रोहित गावडे हा हल्ल्यात यामध्ये जखमी झाले आहेत. तर समाधान बाविस्कर असे हल्ला करणाऱ्या जावयाचे नाव आहे. समाधानचे २० मे रोजी चिदानंद गावडे यांच्या मुलीशी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसातच पती-पत्नीमध्ये छोट्या छोट्या कारणांमुळे वादविवाद सुरू झाले होते. सततच्या वादामुळे चिदानंद यांची मुलगी कायमची माहेरी आली. यावेळी तिने आपल्यासोबत स्वत: खरेदी केलेल्या संसार उपयोगी वस्तू देखील आणल्या होत्या. याच वस्तू मागण्यासाठी समाधान आपल्यासोबत पाच ते सहा जणांना घेऊन गावडे यांच्या घरी गेला होता.

यावेळी गावडे यांनी विरोध केल्यानंतर समाधान व सोबत आलेल्या पाच ते सहा जणांनी लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी रेखा गावडे, चिदानंद गावडे आणि रोहित गावडेवर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in