आजपासून शिव्या बंद! उल्हासनगर मध्ये अनोख्या मोहिमेला सुरुवात

उल्हासनगरमध्ये ‘आजपासून शिव्या बंद’ या अनोख्या मोहिमेला सुरुवात झाली असून स्त्रीवाचक शिव्यांविरोधात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आजपासून शिव्या बंद! उल्हासनगर मध्ये अनोख्या मोहिमेला सुरुवात
Published on

उल्हासनगर : महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादनापुरते मर्यादित न राहता त्यांच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा ठाम संदेश उल्हासनगरातून देण्यात आला आहे. स्त्रीसन्मानाच्या घोषणांमध्ये आणि दैनंदिन व्यवहारातील भाषेत असलेल्या विसंगतीला थांबवण्यासाठी शिव्या बंद असा निर्धार करण्याचे आवाहन 'कायद्याने वागा' संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर यांनी केले आहे.

समाजातील भाषिक संस्कृती आणि स्त्रीसन्मान याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी 'कायद्याने वागा' या सामाजिक संघटनेतर्फे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. स्त्रीवाचक शिव्या देणे ही गंभीर वैचारिक विसंगती आहे, असे स्पष्ट करत राज असरोंडकर यांनी नागरिकांना आत्मपरीक्षणाचा संदेश दिला.

फुले यांच्या विचारांमध्ये स्त्रीसमानता आणि सन्मानाला अत्यंत महत्त्व आहे. मात्र, आजच्या दैनंदिन बोलण्यातून स्त्रियांचा अवमान होत असल्याचे चित्र दिसते. ही दुटप्पी भूमिका बदलण्यासाठी "आजपासून शिव्या बंद" हा संकल्प प्रत्येकाने स्वीकारावा, असे आवाहन करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in