Ulhasnagar : ट्रकच्या धडकेत पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

उल्हासनगरच्या धोबीघाट परिसरातील महादेव कंपाउंड येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच वर्षीय मेहेक शर्मा या चिमुकलीचा मृत्यू झाला.
Ulhasnagar : ट्रकच्या धडकेत पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Ulhasnagar : ट्रकच्या धडकेत पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Published on: 

उल्हासनगर : उल्हासनगरच्या धोबीघाट परिसरातील महादेव कंपाउंड येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच वर्षीय मेहेक शर्मा या चिमुकलीचा मृत्यू झाला. खेमानी परिसराकडून धोबीघाटच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने मेहेकला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असून, काही वाहने वेगाने धावत असल्याने अपघाताचा धोका कायम असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महादेव कंपाऊंड परिसरात स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडे प्रशासनाने पुरेसे लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

संबंधित ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून, अपघात नेमका कसा घडला, याचा तपास उल्हासनगर पोलिसांकडून सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in