झाडाला लटकलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; आत्महत्या की नियोजनबद्ध हत्या? संशयाचे सावट, नातेवाईकांचा आरोप

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाचमधील प्रेम नगर टेकडी परिसरात एका तरुणाचा झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सौरभ गायसमुद्रे असे मृत तरुणाचे नाव असून, ही आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
झाडाला लटकलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
झाडाला लटकलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळछायाचित्र सौ. - Navneet Barhate
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाचमधील प्रेम नगर टेकडी परिसरात एका तरुणाचा झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सौरभ गायसमुद्रे असे मृत तरुणाचे नाव असून, ही आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

प्रेमनगर टेकडी परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या जंगलामध्ये स्थानिक नागरिकांना झाडाला लटकलेला तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलीस आणि स्थानिक प्रतिनिधींना कळवले. घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला.

या प्रकरणात मृत सौरभचे कुटुंबीय अतिशय भावनिक अवस्थेत आहेत. त्यांनी थेट पोलिसांसमोर आरोप करत सांगितले की, सौरभने स्वतःहून असे पाऊल उचलण्याचा प्रश्नच येत नाही. त्याला फसवून, मारहाण करून गळफास लावण्यात आला आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांचे म्हणणे आहे की, सौरभच्या वागणुकीत कोणताही नैराश्याचा लवलेश नव्हता. घटनास्थळी आढळलेले पुरावे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in