डोंबिवलीजवळील दावडी येथील तलावात बुडून भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

यातील तरुण हा डॉक्टर होता तर त्याच्या बहिणीला १०विला ९१ टक्के मिळाले होते.
डोंबिवलीजवळील दावडी येथील तलावात बुडून भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
Published on

डोंबिवली ( शंकर जाधव ) तलावात बुडून बहीण भावाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास डोंबिवलीजवळील दावडी गावदेवी मंदिराजवळ घडली.बहीण भाऊ डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्रनगर परिसरातील होते.पोलिसांना तरुणाच्या खिशातील लायसन्स मिळाले होते.यातील तरुण हा डॉक्टर होता तर त्याच्या बहिणीला १०विला ९१ टक्के मिळाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कीर्ती रविंद्रन (१५ ) व रणजित रविंद्रन ( २३) असे मृत पावलेल्या र्जीभाऊ बहिणीचे नाव असून ते डोंबिवली पश्चिम उमेशनगर परिसरातील मधील रहिवासी साई श्रद्धा चाळीत राहत होते.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी

अग्निशमन विभाग, पोलीस व ग्रामस्थ पोहोचले.दोघांचा मृतदेह तलावातून बाहेर काढल्यानंतर रविजितच्या खिशात पोलिसांना लायसन्स सापडले.हे लायसन्स त्याच्या आईचे होते.

रविजित आणि कीर्ती हे दोघे रविवारी दुपारी कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी दावडी गावाजवळील गावदेवी मंदिरालगत तलावात उतरले. मात्र दोघांचा पाय घसरून तलावात बुडून मृत्यू पावले.ही माहीती मिळताच माजी नगरसेवक जालिंदर पाटील, ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.या दोघांचा मृतदेह पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आला होता.

डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्रनगर परिसरातील गुरुसाईचरण इमारतीत आई वडील आणि दिघे मुले रविजित आणि कीर्ती हे कुटुंब राहत होते.त्यांची आई उमेशनगर मधील साईश्रद्धा चाळीत ट्युशन घेत असे.आईवडील गावी गेले होते.रविवारी दोघे आपल्या कुत्र्याला घेऊन दुचाकीवरून दावडी येथील तलावात गेले होते.

logo
marathi.freepressjournal.in