उरण रेल्वे स्थानकाबाहेर कारने दोघांना चिरडले

शनिवार रात्री हा अपघात झाला. बोकडविरा फाट्यावरून उरणकडे जाणाऱ्या कारचालकाने रेल्वे स्थानकाच्या गेट समोरून जाणाऱ्या स्कूटीला धडक दिली.
उरण रेल्वे स्थानकाबाहेर कारने दोघांना चिरडले

उरण : उरण रेल्वे स्टेशन गेटजवळ एका भरधाव कारने स्कुटीवर जाणाऱ्या एका दाम्पत्यासह त्यांच्या मुलीला जोरदार धडक दिली. या धडकेत हे दाम्पत्य ठार झाले तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे पवित्र मोहन बराल (४०), रश्मिता पवित्र बराल (३७) अशी असून परी पवित्र बराल ही लहान मुलगी जखमी झाली आहे.

शनिवार रात्री हा अपघात झाला. बोकडविरा फाट्यावरून उरणकडे जाणाऱ्या कारचालकाने रेल्वे स्थानकाच्या गेट समोरून जाणाऱ्या स्कूटीला धडक दिली. यावेळी मुजोर चालकाने जखमी लहान मुलीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता मदतीला आलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबल अतुल चौहाण यांच्याशी हुज्जत घातली. या प्रकरणी कारचालक जय चंद्रहास घरत हा फरार झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in