केडीएमसी रुग्णवाहिकेचा वापर झाडांच्या कुंड्या नेण्यासाठी!

शास्त्रीनगर रूग्णालय डोंबिवली, वसंत व्हाँली सुतीकागृह ही रुग्णालये पालिकेच्या अधिपत्याखाली आहेत.
केडीएमसी रुग्णवाहिकेचा वापर झाडांच्या कुंड्या नेण्यासाठी!

कल्याण : केडीएमसी महापालिकेच्या रुग्णालयांतील रुग्णवाहिकेचा वापर चक्क झाडांच्या कुंड्या नेण्यासाठी झाला असल्याचे समोर आले आहे. यामुळे पालिकेच्या एकूणच कारभारावर प्रश्न निर्माण होत आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे रूक्मिणीबाई रुग्णालय कल्याण, शास्त्रीनगर रूग्णालय डोंबिवली, वसंत व्हाँली सुतीकागृह ही रुग्णालये पालिकेच्या अधिपत्याखाली आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी प्रभागक्षेत्र निहाय मिनी रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. कधी-कधी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रूग्णांची तारबंळ झाल्याच्या घटना घडून देखील प्रशासन रुग्णवाहिकांबाबत दक्ष भूमिका कधी घेणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला कारणही तसे असून, रुग्णवाहिकेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याच्या दिवशीच तुळशीची रोपे आणि झाडांच्या कुंड्या नेल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

यामुळे मनपाच्या दिमीतीला असणारी वाहने गेली कुठे? असा गंभीर सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे. तर संध्याकाळच्या सुमारास मुख्यालयात रुग्णवाहिकेतून आणलेल्या तुळशी रोपं आणि झाडांच्या कुंड्यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे नको त्याबाबतीत प्रशासन किती गतीमान आहे. यांच्या चर्चा पालिका वर्तुळात रंगल्या होत्या. याबाबत मुख्य आरोग्य आधिकारी आश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

logo
marathi.freepressjournal.in