वसई क्रीडा मंडळाचे सचिव रतिश दीनानाथ राऊत यांचे निधन

वसई-विरार महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नितीन राऊत आणि वसई विकास बँकेचे अध्यक्ष आशय राऊत यांचे ते भाऊ होते.
वसई क्रीडा मंडळाचे सचिव रतिश दीनानाथ राऊत यांचे निधन

वसई : वसई क्रीडा मंडळाचे सचिव रतिश दीनानाथ राऊत यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी शीतल रतिश राऊत व मुलगा स्वरल रतिश राऊत असा परिवार आहे. वसई-विरार महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नितीन राऊत आणि वसई विकास बँकेचे अध्यक्ष आशय राऊत यांचे ते भाऊ होते. वसई तालुक्यातील नरवीर चिमाजी आप्पा मैदान आणि वसई तालुका कला क्रीडा महोत्सव यांचे संलग्न कार्य असून, या क्रीडा मंडळाच्या सहाय्याने महोत्सव होतो. त्या मंडळावर वडील स्व. दीनानाथ राऊत यांच्या नंतर रतिश हे सचिव म्हणून काम पाहत होते. त्यांच्यावर होळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंकार करण्यात आले. यावेळी कला, क्रीडा आणि संजिक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in