वसंत डावखरे सीडी प्रकरणात मोठा निर्णय; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची मुक्तता

सुमारे १७ वर्षे जुन्या वसंत डावखरे सीडी प्रकरणात कल्याण न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, तत्कालीन शिवसेना उमेदवार आनंद परांजपे आणि सभेचे आयोजक रमाकांत देवळेकर यांची निर्दोष मुक्तता केली.
वसंत डावखरे सीडी प्रकरणात मोठा निर्णय; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची मुक्तता
वसंत डावखरे सीडी प्रकरणात मोठा निर्णय; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची मुक्तता
Published on

कल्याण : सुमारे १७ वर्षे जुन्या वसंत डावखरे सीडी प्रकरणात कल्याण न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, तत्कालीन शिवसेना उमेदवार आनंद परांजपे आणि सभेचे आयोजक रमाकांत देवळेकर यांची निर्दोष मुक्तता केली.

हे प्रकरण २००९च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात शिवसेनेच्या वतीने आयोजित सभेत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांची कथित वादग्रस्त सीडी दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर डावखरे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मानहानीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांना आरोपी करण्यात आले होते.

या प्रकरणाची सुनावणी कल्याण न्यायालयात तब्बल १७ वर्षे सुरू होती. बुधवारी न्यायालयाचे न्यायाधीश संतोष आगे यांनी चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. निकालानंतर आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया देताना, जवळपास १७ वर्षे सुरू असलेल्या या खटल्यातून आता न्याय मिळाल्याचे सांगितले. तसेच वसंत डावखरे तेव्हाही आपल्यासाठी आदरणीय होते आणि आजही आहेत, असे त्यांनी नमूद केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in