तळा पोलिसांकडून गावठी दारूवर धाड

तळा पोलिसांकडून गावठी दारूवर धाड

पोलिसांनी कारवाई न थांबवता जंगल भागाचा देखील जवळपास दोन ते तीन तास चालत तपास केला.

तळा : तळा तालुक्यातील मौजे मेढा येथे तळा पोलिसांनी गावठी हातभट्टीच्या दारूवर धाड टाकून दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की तळा पोलिसांना मेढा हद्दीत गावठी दारूसाठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती, त्या अनुषंगाने तळा पोलिसांनी सापळा रचून मेढा आदिवासी वाडीत अनेक ठिकाणी सोमवारी संध्याकाळी सहा वाजल्याच्या सुमारास छापेमारी केली. त्या ठिकाणी तपास करत असताना दोन घरांमध्ये अवैध स्वरूपात गावठी दारू आढळून आली.

मात्र पोलिसांनी कारवाई न थांबवता जंगल भागाचा देखील जवळपास दोन ते तीन तास चालत तपास केला.अथक परिश्रमानंतर पोलीस पथकाला चार ते पाच रबरी ट्यूबमध्ये आणि प्लास्टिक ड्रममध्ये जवळपास १५० लिटर गावठी दारू आढळून आली. ही गावठी दारू तळा पोलिसांनी जागेवरच नष्ट केली आणि दोन घरांमध्ये अवैद्य गावठी दारू मिळून आल्या प्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली.

तळा पोलिसांकडून ही धडक कारवाई करण्यात आल्याने तळा पोलीस ठाण्याचे सहा.पो. निरीक्षक गणेश कराड आणि कर्मचाऱ्यांचे मेढा येथील आदिवासी महिलांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in