विशाख कृष्णास्वामीची धाव विश्वविक्रमाच्या दिशेने; कॅन्सरग्रस्त, गरिबांना देतो मदतीचा हात

मोडेल इंग्लिश स्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाल्यानंतर त्याने मॉडेल कॉलेजमधून एम.कॉम पर्यंतचे शिक्षण घेतले आहे
विशाख कृष्णास्वामीची धाव विश्वविक्रमाच्या दिशेने; कॅन्सरग्रस्त, गरिबांना देतो मदतीचा हात

सतत दीडशे दिवस धावून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची इच्छा असणारा २८ वर्षीय डोंबिवलीतील धावपटू विशाख कृष्णास्वामीकडून कॅन्सरग्रस्त व गरिबांना देतोय मदतीचा हात दिला जात आहे. विश्वविक्रम करण्यासाठी रोज २१ किमी असा तब्बल १५० दिवस धावत राहणार असून आतापर्यत ६५ दिवस पूर्ण झाले असल्याचे विशाख कृष्णास्वामी यांनी सांगितले.

विशाख हा डोंबिवलीतील स्टार कॉलनीत आपल्या आईसह राहतो. मोडेल इंग्लिश स्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाल्यानंतर त्याने मॉडेल कॉलेजमधून एम.कॉम पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो एका इन्शुरन्स कंपनीत काम करतो. मागील पाच वर्षापासून तो धावणे या क्रीडा प्रकाराकडे वळला. २०२१ मध्ये त्याने बंगलोर येथे पार पडलेल्या ३०० किमी. धावण्याच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला. यामुळे आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्याने सलग २१ दिवस पायात कुठलेही चप्पल, बूट न घालता (barefoot half marathon) हाफ मॅरेथॉन पूर्ण केली, पूर्वी हा विश्वविक्रम न्यूझीलंडच्या एका धावपटूच्या नावे २५ दिवसाचा असल्याचे त्याने सांगितले.

सध्या तो एका नविन विश्वविक्रमासाठी धावत आहे. २३ मे पासून रोज सकाळी ७ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान सलग अडीच तास रोज २१ किलोमीटर धावतो आणि हे सलग १५० दिवस करण्याचा त्याचा मानस आहे. त्यानुसार तब्बल ३१५० किमी धावल्यानंतर विशाखची वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये विश्वविक्रमवीर म्हणून नोंद होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in