डोंबिवलीतील पोलिसांचा आवाज 'व्हॉइस ऑफ ठाणे' स्पर्धेत

डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहुल मांडगे यांची आवाज 'व्हॉइस ऑफ ठाणे' स्पर्धेत निवड झाली आहे
डोंबिवलीतील पोलिसांचा आवाज 'व्हॉइस ऑफ ठाणे' स्पर्धेत

अनेक चित्रपटात आपल्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करून महाराष्ट्रातील अनेक पोलिसांनी आपली कला सादर केली होती. आता पोलिसांचा सुरेख आवाज ठाणे येथील 'व्हॉइस ऑफ ठाणे' स्पर्धेत ऐकण्यास मिळणार आहे. डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहुल मांडगे यांची 'व्हॉइस ऑफ ठाणे' स्पर्धेत निवड झाली आहे. युटूयूब आणि फेसबुक सारख्या माध्यमातून मांडगेना अनेकांनी पसंती दर्शविली आहे. २१ स्पर्धकांमध्ये यांची निवड झाली असून २६ जून रोजी ठाणे येथील बौद्ध समाज उन्नती मंडळ समाज सभागृहात होणाऱ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मांडगे विजयी ठरावे अशी अपेक्षा पोलीस खात्याकडूनच नव्हे तर डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत.

नुकतेच ठाकुर्ली येथील हॅप्पी स्ट्रीट मध्ये मांडगे यांनी सादर केले गाणे ऐकून कल्याण परिमंडळ -३ चे उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कौतुक केले होते. एवढेच नव्हे उपस्थित नागरिकांनी मांडगे यांच्या गाण्यावर डान्स केला होता. मांडगे यांना मिळालेली हि कौतुकाची थाप थेट स्पर्धेत उपयोगी होईल असा विश्वास व्यक्त केला. मांडगे यांचे तीन मोठे ऑपरेशन झाले आहेत. अशा कठीण प्रसंगातून मांडगे बाहेर पडले. आपली कला जोपासल्याबद्दल वरिष्ठांकडून नेहमीच प्रोत्साहन मिळाले असे मांडगे म्हणतात.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in