ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढणार; लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र स्वीप नोडल अधिकारी

या कार्यक्रमात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले.
ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढणार; लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र स्वीप नोडल अधिकारी

ठाणे : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदान टक्केवारी वाढविण्याकरिता व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्यातील २३-भिवंडी, २४-कल्याण व २५-ठाणे या लोकसभा मतदारसंघाकरिता स्वतंत्र स्वीप नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत तसेच जिल्हा कार्यालयातर्फे मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मतदार जनजागृतीचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या कार्यक्रमात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले. मतदार नोंदणीकरिता नमुना नं. ६ चे अर्ज तसेच व्होटर हेल्पलाईनबाबत माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांना मतदार नोंदणीविषयी प्रश्न विचारण्यात आले व मतदार जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले कप वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आगामी काळात देखील असेच जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, असे ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in