ऐन पावसाळ्यात ठाण्यामध्ये पाण्यासाठी झुंबड; उच्चभ्रू गृहसंकुलांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

शहरातील झोपडपट्टी भागात पाण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडत असून उच्चभ्रू गुहसंकुलांमध्येही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ऐन पावसाळयात ठाण्यात पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत असल्याचा संताप ठाणेकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात आणि पिसे पम्पिंग स्टेशनमध्ये गाळ आल्याने पाणीपुरवठ्यावर झालेला परिणाम यामुळे ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील झोपडपट्टी भागात पाण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडत असून उच्चभ्रू गुहसंकुलांमध्येही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ऐन पावसाळयात ठाण्यात पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत असल्याचा संताप ठाणेकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अद्याप समाधानकारक पाऊस पडला नसल्याने धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा निर्माण झालेला नाही, तर दुसरीकडे तांत्रिक कारणांमुळे शहरात पाणी पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. भातसा धारण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. परिणामी पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा जवळपास ४० टक्क्यांनी कमी झाला आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेने देखील यापूर्वीच १० टक्के पाणी कपात लागू केली ठाणेकरांना केवळ ५० टक्केच पाणी पुरवठा सध्या होत आहे.

नागरिकांकडून संताप

शहरातील वागळे, इंदिरानगर, ज्ञानेश्वरनगर,तसेच इतर झोपडपट्ट्यांमध्ये अक्षरशः पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड उडत आहे. शिवाई नगरमध्ये पाणीच येत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे घोडबंदर पट्ट्यातील उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आता टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासाठी वाटेल ती किंमत टँकर माफियांना मोजावी लागत आहे. महापालिकेच्या वतीने पिसे पम्पिंग स्टेशनचे काम येत्या दोन दिवसांत संपेल असा दावा केला आहे; मात्र यामुळे गेले दोन दिवस ठाणेकरांना प्रचंड पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने सर्वच नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in