सप्टेंबरच्या पावसाने मिटवली ठाणे जिल्ह्यातील पाण्याची चिंता

गेल्या पंधरवड्यात बदलापूर शहर व लगतच्या ग्रामीण भागात तसेच बारवी धरण क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर पकडला होता
सप्टेंबरच्या पावसाने मिटवली ठाणे जिल्ह्यातील पाण्याची चिंता

सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटवली आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध होता. त्यात सप्टेंबरच्या पावसाने पुन्हा भर घातल्यामुळे सध्या बारवी धरणात जवळपास ९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून त्यामुळे ठाणे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या पंधरवड्यात बदलापूर शहर व लगतच्या ग्रामीण भागात तसेच बारवी धरण क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर पकडला होता. त्यामुळे बदलापुरातुन वाहणारी उल्हासनदी दुथडी भरून वाहू लागली होती.१४ व १५ सप्टेंबरला तर पावसाचे धुमशान पाहायला मिळत होते. यावेळी अवघ्या २४ तासात १०० मिमीहून अधिक पाऊस झाला होता. या पावसामुळे उल्हासनदी धोक्याच्या इशारा पातळीजवळ पोहचली होती. तर बारवी धरणातील पाण्याची पातळी वाढली वाढल्याने ११ स्वयंचलित दरवाजे उघडले जाऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता.त्यामुळे या पावसाने नागरिक धास्तावले होते. मात्र आता याच पावसाने ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटवली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in