उल्हास नदीपात्रातील पाण्यावर जलपर्णीचा विळखा

या उल्हासनदी पाण्याचे नियोजन लघुपाटबंधारे विभागामार्फत केले. बारवी धरणाचे पाणी उल्हासनदी पत्रातात सोडले असता पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी देखील वाहून जाते.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मोहने बंधारा परिसरातील उल्हास नदीपात्रातील पाण्यावर जलपर्णीने विळखा घातला असून, या जलपर्णी च्या विळख्याने नदीच्या पाण्यातील जलचर सृष्टीचे चक्र धोक्यात आले आहे. काही जाणकारांच्या मते पाण्यातील दूषित घटक शोषून घेण्याचे काम जलपर्णी करीत असल्याने जैविक पर्यावरणपूरक आहे.

उल्हास नदीमध्ये गेल्या सहा वर्षांमध्ये जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या जलपर्णी वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यानंतर पाण्यावर पूर्णपणे आच्छादन तयार होते. नदीमध्ये दूषित नाल्याचे, सांडपाणी प्रक्रिया न करता थेट सोडले जात असल्याने या दूषित पाण्यात जलपर्णी फोफवते आणि नदीच्या पाण्याचे प्रदूषण वाढण्याचा धोका निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

याबाबत पर्यावरणतज्ज्ञ गुणवंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, उल्हास नदी संदर्भात जैविक शुद्धीकरणाचे प्रस्ताव कल्याण डोंबिवली मनपा, बदलापूर नगरपालिका यांच्याकडे सादर केले असून, नदीच्या पाण्यात येणारे दूषित पाणी, सांडपाणी यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. नदी तीरावर असणारी नैसर्गिक बेशरम वनस्पती तसेच लव्हाळे इत्यादी वनस्पतीचा ऱ्हास हा देखील थांबविला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

उल्हास नदी पाण्यात केमिकल मिश्रीत दूषित पाणी येत नसून घरगुती सांडपाणी मिश्रीत पाणी येत असल्याने जलपर्णी नदी पात्राच्या पाण्यावर दिसून येत आहे. जलपर्णीबाबत स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या पातळीवर उपाययोजना करीत असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण यांच्या अधिकाऱ्याने दिली, तर कल्याण-डोंबिवली मनपा कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा प्रमोद मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, उल्हास नदी पाण्यातील जलपर्णी काढण्याचे आठ लाखांचे काम एजन्सीला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

जलपर्णीपुढे प्रशासन हतबल

या उल्हासनदी पाण्याचे नियोजन लघुपाटबंधारे विभागामार्फत केले. बारवी धरणाचे पाणी उल्हासनदी पत्रातात सोडले असता पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी देखील वाहून जाते. मोहने बांधरा ओव्हर फोल्ओ झाल्यास जलपर्णी कल्याण खाडीत जाते. गेल्या ५ वर्षांत उल्हास नदीची जलपर्णीपासून मुक्तता होण्यासाठी तसेच उल्हासनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध सामाजिक संघटना प्रयत्नशील असून, देखील प्रशासनाने या जलपर्णी पुढे हतबल झाल्याचे ठोस उपाययोजना होत नसल्याने दिसून येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in