जिल्ह्यात महाविकास आघाडीचा पुन्हा झेंडा फडकवू; आमदार सुनिल भुसारा यांचे प्रतिपादन

आज भाजप आणि विरोधक धार्मिक मुद्दे पुढे आणून जातीच्या नावावर राजकारण करीत आहेत. सर्व घटक पक्षाकडून याचवेळी वाढती महागाई, बेरोजगारी, २कोटी नोकऱ्यांचे आश्वासन, १५ लाख देण्याची घोषणा यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे.
जिल्ह्यात महाविकास आघाडीचा पुन्हा झेंडा फडकवू; आमदार सुनिल भुसारा यांचे प्रतिपादन

जव्हार: आज भाजप आणि विरोधक धार्मिक मुद्दे पुढे आणून जातीच्या नावावर राजकारण करीत आहेत. सर्व घटक पक्षाकडून याचवेळी वाढती महागाई, बेरोजगारी, २कोटी नोकऱ्यांचे आश्वासन, १५ लाख देण्याची घोषणा यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. तशीच स्थिती राज्यातही आहे, यामुळे या शक्तीला रोखण्यासाठी देशात इंडिया आघाडी एकत्र झाली आहे. अशावेळी पालघर जिल्ह्यात त्यांचा पराभव करण्यासाठी माहविकास आघाडीची वज्रमूठ आपण बांधली असून या आधी सुध्दा आघाडीतून लढलेल्या महाआघाडीचे सर्व आमदार विधानसभांवर निवडून आले होते. यावेळी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्यासोबत आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा आपला महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू, असा विश्वास आमदार सुनिल भुसारा यांनी यावेळी व्यक्त केला.

पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून बैठकांचा धडाका लावला असून यामध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी, सीपीएम, काँग्रेस या पक्षातील सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विकास मोरे यांनी आपण सर्व एकत्र आलो आहोतच, उद्धव ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी यांनी साथ दिली आहे. त्यामुळे उमेदवार कोणाचाही आणि कोणताही असो त्याला पूर्ण ताकदीने निवडून देऊन जिल्हा भाजपमुक्त करण्याचे आवाहन मोरे यांनी केले आहे. सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे यांनी सांगितले की, उमेदवार स्थानिकच देण्यात येईल यामुळे येथील विकास करण्यास तो कटीबध्द असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in