वेस्ट की ईस्ट? आता नाही होणार संभ्रम; कर्जत रेल्वे स्थानकात लागले दिशादर्शक फलक!

अखेर कर्जत रेल्वे स्थानकावर दिशा दर्शविणारे फलक सुमारे १६३ वर्षांनी लावण्यात आले...
वेस्ट की ईस्ट? आता नाही होणार संभ्रम; कर्जत रेल्वे स्थानकात लागले दिशादर्शक फलक!
Published on

विजय मांडे/कर्जत

कर्जत रेल्वे स्थानक १८६० साली सुरू झाले. मात्र या स्थानकांवर पूर्व दिशा कोणती? व पश्चिम दिशा कोणती असा संभ्रम नवीन प्रवाशांना पडत असे मात्र याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन कर्जत रेल्वे स्थानकावर दिशा दर्शविणारे फलक सुमारे १६३ वर्षांनी लावण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना सोयीचे झाले आहे.

मुंबई - ठाणे रेल्व धावल्यानंतर प्रथम १८५९ साली पळसदरी रेल्वे स्थानक निर्माण झाले. त्यानंतर १८६० - ६१ मध्ये कर्जत रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. त्यानंतर अगदी फलाट वाढले, स्वयंचलित जिने आले, अनेक सुविधा झाल्या परंतु कर्जत रेल्वे स्थानकात पूर्व दिशा कोणती? व पश्चिम दिशा कोणती? असा प्रश्न नवीन प्रवाशांना पडत असे.

कर्जत तालुका पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने शनिवार व रविवारी प्रचंड गर्दी रेल्वे स्थानकावर होत असते. त्यामुळे नवीन प्रवडी व  पर्यटकांमध्ये दिशेबद्दल संभ्रम होत असे. मात्र, आता दिशादर्शक फलक लावल्याने अखेर प्रवाशांची व पर्यटकांची चांगली सोय झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in