जिथे जाईन तेथे देशसेवाच करेन -समीर वानखेडे

माझ्यावर खूप दबाव आला. पण त्या दबावापुढे मी झुकलो नाही. उलट माझ्यावर झालेल्या टीकेकडे मी इन्फोटेन्मेंट म्हणून पाहिले.
जिथे जाईन तेथे देशसेवाच करेन -समीर वानखेडे
Published on

बदलापूर : काहींना मी मुंबईत नको असल्याने मी चेन्नईत गेलो. पण मी माझ्या देशालाच कार्यक्षेत्र समजतो. त्यामुळे जिथे जाईन तिथे देशाची सेवाच करेन, असे प्रतिपादन आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी केले. आजवर झालेल्या टीकेकडे आपण इन्फोटेन्मेंट म्हणून पाहिल्याचेही त्यांनी सांगितले.

रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे स्वामी विवेकानंद ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन विषयक व्याख्यान मालिकेचे पहिले पुष्प आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी गुंफले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करताना एकाग्र मनोवृत्ती आणि आपण ही परीक्षा नेमकी का देतोय? याची भूमिका तुमच्या मनात स्पष्ट असायला हवी. तसेच अधिकारी होणे हे राष्ट्रकार्य आहे. त्यामुळे अधिकारी झाल्यावर तुमच्यावर कितीही आघात झाले तरी शांत डोक्याने संविधान मनात ठेवून योग्य ती कृती करावी. मी आजवर ३५०० हून अधिक केसेस केल्या आहेत. या काळात माझ्यावर खूप दबाव आला. पण त्या दबावापुढे मी झुकलो नाही. उलट माझ्यावर झालेल्या टीकेकडे मी इन्फोटेन्मेंट म्हणून पाहिले. राजकीय क्षेत्र, कथित सेलिब्रिटी यांतील काहींनी माझी प्रचंड बदनामी केली. पण त्याच्याकडे लक्ष न देता मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत केल्याचे समीर वानखेडे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in