भिवंडीच्या सरावलीतील गेबी बिझनेस पार्कला प्रतिसाद; ग्रामीण भागातील ग्राहकांचीही मॉल संस्कृतीकडे पावले!

गोदाम व्यवसायात आघाडीवर असलेल्या भूमी वर्ल्ड कंपनीने प्रथमच मॉल व्यवसायात पाऊल टाकले असून, भविष्यात आणखी एक प्रशस्त मॉल उभारला जाईल, अशी माहिती भूमी वर्ल्ड कंपनीचे चेअरमन नानजीभाई पटेल व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पटेल यांनी दिली.
भिवंडीच्या सरावलीतील गेबी बिझनेस पार्कला प्रतिसाद; ग्रामीण भागातील ग्राहकांचीही मॉल संस्कृतीकडे पावले!
Published on

भिवंडी : मुंबईसह महाराष्ट्रातील शहरांमध्ये मॉल संस्कृती रुजली असताना, आता ग्रामीण भागातील ग्राहकांचीही पावले मॉल संस्कृतीकडे वळत आहेत. भिवंडीचा ग्रामीण भाग असलेल्या सरावलीत सुरू झालेल्या गेबी बिझनेस पार्कला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गोदाम व्यवसायात आघाडीवर असलेल्या भूमी वर्ल्ड कंपनीने प्रथमच मॉल व्यवसायात पाऊल टाकले असून, भविष्यात आणखी एक प्रशस्त मॉल उभारला जाईल, अशी माहिती भूमी वर्ल्ड कंपनीचे चेअरमन नानजीभाई पटेल व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पटेल यांनी दिली.

भिवंडी व शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना नामांकित ब्रॅण्डचे कपडे, बूट आणि विविध उत्पादनांच्या खरेदीसाठी मुंबई-ठाण्यात जावे लागते. या भागात वेगाने वाढणारे नागरीकरण, गोदाम व्यवसायामुळे स्थायिक होणारी कुटुंबे आणि स्थानिक ग्राहकांचा वर्ग लक्षात घेऊन भिवंडी तालुक्यातील सरावली येथे ४० हजार चौरस फुटांचा हायस्ट्रीट रिटेल आऊटलेट मॉल असलेला गेबी बिझनेस पार्क उभारण्यात आला आहे. या पार्कमध्ये जागतिक दर्जाच्या ब्रॅण्डेड कंपन्यांची प्रशस्त दालने उभारली असून, त्यात रेडिमेड कपडे, कॉर्पोरेट ऑफिससाठीचे कपडे, बूट आणि विविध वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंच्या विक्रीवर वर्षातील ३६५ दिवस जास्तीत जास्त ७० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. त्यातून ग्राहकांचा फायदा होईल, असे चेअरमन नानजी पटेल व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पटेल यांनी सांगितले.

गेबी बिझनेस पार्कचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. गेल्या दोन दिवसांत हजारो ग्राहकांनी विविध कंपन्यांच्या दालनांमधून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. ग्राहकांच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. भविष्यात भिवंडीच्या ग्रामीण भागात आणखी एक पाच लाख फुटांचा प्रशस्त मॉल उभारला जात आहे. त्यात ८६ लाइफस्टाईल स्टोअर, ५५ फूड ब्रॅण्ड, ४ मिनिप्लेक्स स्क्रीन आणि २५ हजार फूट गेमिंग झोनचा समावेश असेल. तो लवकरच ग्राहकांसाठी खुला होईल, असे पटेल यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in