वाढदिवसाच्या शुभेच्छा देता देता मोबाईलही घेऊन गेला

आईशी बोलतबोलत येतायेता हातकी सफाई करत रियलमी कंपनीचा २५ हजार किमतीचा अँड्रॉईड मोबाईल फोन घेऊन निघून गेला.
वाढदिवसाच्या शुभेच्छा देता देता मोबाईलही घेऊन गेला

भाईंंदर : भाईंदर पश्चिमेला डेकोरेशनचा व्यवसाय करणाऱ्या नरेंद्र जालान यांचा सरत्या शेवटी वाढदिवस असल्याने त्यांचा जुना कामगार शुभेच्छा देण्यासाठी आला आणि जाता जाता हात की सफाई करत मोबाईल घेऊन गेल्याने भाईंदर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर पश्चिमेच्या नारायण शाळे समोर असलेल्या गार्डन कोर्ट इमारतीमध्ये राहणाऱ्या नरेंद्र जालान यांचा डेकोरेशनचा व्यवसाय असून त्यांच्याकडे नऊ महिन्यांपूर्वी भोला ऊर्फ विशाल यादव हा काम करीत होता. तो काम सोडून गेल्यानंतर अधूनमधून त्यांच्याकडे घरी येत-जात होता.

३१ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता तो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेला आणि त्यानंतर जालान यांच्या आईशी बोलतबोलत येतायेता हातकी सफाई करत रियलमी कंपनीचा २५ हजार किमतीचा अँड्रॉईड मोबाईल फोन घेऊन निघून गेला. जालान यांच्या पत्नीने इतरत्र शोध घेतला असता मोबाईल कुठेही मिळून आला नाही. तेंव्हा तक्रारदार जालान यांच्या आईने तो मोबाईल भोला उर्फ विशाल यादव यांच्या हातात बघितल्याचे सांगितले त्यावरून भाईंदर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भाईंदर पोलीस करत आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून चोराचा शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in