मुरबाडमध्ये कुणाला मौका, कुणाला धक्का?

Maharashtra assembly elections 2024: मुरबाड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार पडली असून ६७.३९ टक्के मतदान झाले आहे. गेल्या तीन निवडणुकीत मुरबाड मतदारसंघात झालेले हे सर्वाधिक मतदान आहे. त्यामुळे मतदानाचा हा वाढलेला टक्का कुणाला मौका आणि कुणाला धक्का देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
किसन कथोरे, सुभाष पवार (डावीकडून)
किसन कथोरे, सुभाष पवार (डावीकडून)
Published on

बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार पडली असून ६७.३९ टक्के मतदान झाले आहे. गेल्या तीन निवडणुकीत मुरबाड मतदारसंघात झालेले हे सर्वाधिक मतदान आहे. त्यामुळे मतदानाचा हा वाढलेला टक्का कुणाला मौका आणि कुणाला धक्का देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदान शांततेत पार पडले. या निवडणुकीत मुरबाड मतदारसंघात ६७.३९ टक्के मतदान झाले आहे, जे या मतदार संघाच्या गेल्या तीन निवडणुकांतील सर्वाधिक मतदान आहे. मतदानानंतर आपल्याच उमेदवाराचा विजय होणार असल्याचा दावा महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा मतदानाचा हा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार याचीच चर्चा सध्या मतदार संघात रंगली आहे. मुरबाड विधानसभा मतदार संघात भाजप आमदार किसन कथोरे यांनी आमदारकीची हॅटट्रिक पूर्ण केली असून यंदा चौथ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत आहेत. माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने महाविकास आघाडीकडून मैदानात उतरवले आहे. आक्रमक महिला नेतृत्व अशी ओळख असलेल्या संगीता चेंदवणकर यांना मनसेने उमेदवारी दिली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर बदलापुरात किती प्रमाणात मतविभाजन होते व त्याचा फायदा महाविकास आघाडीला किती मिळणार आणि महायुतीला किती मिळणार, हे ही महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात शनिवारी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे संपूर्ण चित्र स्पष्ट होणारच आहे.

logo
marathi.freepressjournal.in