ठाण्याच्या जागेबाबत पक्षश्रेष्ठी घेणार निर्णय; ‘ठाणे’ लोकसभा मतदारसंघाबाबत विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडून संभ्रम कायम

ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडे घेऊन 'कल्याण'ची जागा शिंदे गटाला देण्याची मागणी भाजपकडून सातत्याने करण्यात होत आहे.
ठाण्याच्या जागेबाबत पक्षश्रेष्ठी घेणार निर्णय; ‘ठाणे’ लोकसभा मतदारसंघाबाबत विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडून संभ्रम कायम

नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडे घेऊन 'कल्याण'ची जागा शिंदे गटाला देण्याची मागणी भाजपकडून सातत्याने करण्यात होत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असला तरीही ठाणे लोकसभा मतदारसंघ कुणाला द्यायचा? याबाबत ‘भाजप’चे वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्रित निर्णय घेतील, अशी माहिती माजी खासदार तथा भाजपचे ठाणे लोकसभा निवडणूक प्रमुख विनय सहस्त्रबुद्धे यांनी नेरूळ येथे दिली.

दरम्यान, उमेदवारी कोणालाही मिळाली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करणारा उमेदवार आम्हाला द्यायचा असल्याचे सांगत विनय सहस्त्रबुद्धे यांनी ‘ठाणे’ लोकसभा मतदारसंघाबाबत संभ्रम कायम ठेवला आहे. भाजप १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या वतीने ६ मार्च रोजी नेरूळ, सेक्टर-१२ मधील तेरणा हायस्कूलमागील मैदानावर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विनय सहस्त्रबुद्धे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ठाणे लोकसभा मतदारसंघात यापूर्वी भाजपचे खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढवावी, अशी येथील हजारो कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु, राजन विचारे यांचा पराभव करण्यासाठी शिंदे गटाने ठाणेच्या जागेवर दावा केला आहे. तरीही ठाण्यामधून कोण लढणार? याबाबत पक्षश्रेष्ठी आणि दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळीच निर्णय घेतील, असे विनय सहस्त्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in