पत्नीने घटस्फोटाचा निर्णय घेतला, रागात पतीने जीवघेणा हल्ला केला

राग मनात ठेवून नवऱ्याने रविवारी, २८ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पत्नीच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पत्नीने घटस्फोटाचा निर्णय घेतला, रागात पतीने जीवघेणा हल्ला केला

कर्जत : तालुक्यात राहणाऱ्या वेगवेगळ्या समाजाच्या दोन व्यक्तींनी वीस वर्षांपूर्वी विवाह केला होता; मात्र त्यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असे. याला कंटाळून मुलीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. या प्रकरणाबाबत न्यायालयात दावा दाखल केला होता. याचा राग मनात ठेवून नवऱ्याने रविवारी, २८ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पत्नीच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

कर्जत तालुक्यात राहणारा शेखर रामचंद्र रोकडे आणि सैनी हिचा वीस वर्षांपूर्वी विवाह झाला होता; मात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांच्यात वाद होत असे. याला कंटाळून त्याची पत्नी कविता शेखर रोकडे हिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे न्यायालयात दावा दाखल केला. ती कर्जत शहरातील मुद्रे नाना मास्तर नगर येथे साई सावली अपार्टमेंटमध्ये राहू लागली, तर तिचा पती शेखर रोकडे दीपाली पार्क, शाश्वत पार्क बदलापूर, ठाणे येथे राहावयास गेला. पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला. याचा राग मनात ठेवून तिला ठार मारण्याचा बेत बनवला. त्यानुसार रविवारी, २८ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पत्नी कविता रोकडे मुद्रे नानामास्तर नगर येथून आपल्या स्कुटीने आपले वडील पुरुषोत्तम सैनि राहत असलेल्या नेमिनाथ येथे येत असताना मुद्रे गावचे हद्दीत फायरब्रिगेड ऑफिससमोर आली. त्यावेळी तिला कोणचा तरी फोन आल्याने तिने स्कुटी रस्त्याच्या बाजूला लावून फोनवर बोलत असताना त्या ठिकाणी पती शेखर रोकडे दबा धरून बसला होता, भांडणाचा राग मनात धरून लोखंडी हत्याराने त्याने पत्नी कविता हिच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत करीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in