जव्हारमध्ये ग्रामीण रानभाज्या हे मोठं वरदान

साधारण उन्हाळी आणि पावसाळी या दोन्ही हंगामात निसर्ग देवतेने आदिवासी बांधवांना भरभरून दान केले आहे
जव्हारमध्ये ग्रामीण रानभाज्या हे मोठं वरदान
Published on

ग्रामीण आदिवासी भाग ,त्यातच पुर्वीपासुन निसर्ग पुजक आणि निसर्गाच्या सान्निध्यातच डोंगर, दरीखोरीत, माळरानावर झाप बांधून निसर्गाच्या नियमाच्या आधारित जीवनातील गुजरान करणाऱ्या आदिवासी बांधवांना वनस्पतीसृष्टी बरोबरच जंगलातील इतर जीवनमुल्याचे अधिक दान लाभले आहे. त्यात जंगली रानभाजी हे एक मोठं वरदान ठरले आहे. साधारण उन्हाळी आणि पावसाळी या दोन्ही हंगामात निसर्ग देवतेने आदिवासी बांधवांना भरभरून दान केले आहे.

बाजारातील भाजीपाल्यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे रानभाजीपाल्याने आदिवासी बांधवांना रोजच्या आहारात अधिक दिलासा दिला आहे या भाज्या आदिवासी कुटूंबाना आर्थिक आधार देणाऱ्या ठरतात. निसर्ग उपजत असल्याने आयुर्वेदिकदृष्टया शरीरासाठी अतिशय पौष्टिक ठरतात. डोंगराळ भागात, कडेकपारीत, माळरानावर धुंडाळत आदिवासी बांधव भाजीपाला मिळवत असतात. मानवाचे रोजचे अन्न रासायनिक खते व औषधांचा भरमसाठ वापर यामुळे अनेक आजारांचा सामना सामना करावा लागत आहे.

पाऊस झाल्याने रानभाज्या लवकर उगवल्यात डोंगराळ भाग ज्या भागात पाऊस अधिक अशा सर्वत्र जंगलात माळरान परीसरात मोह ,टोळंबा ,शेवळी, बोंडारा, कुहरुळा, मोखा, पेंड्रा,ह्या उन्हाळी हंगामातील तर रान तेरा, आकऱ्या,उळसा,करटुल आंबटवेल , कोळु , कांचन , रान ज्योत ,भरडा ह्या भाज्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येतात. सुरगाणा, कळवण, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर ,डांग परिसर,जव्हार, मोखाडा ,ठाणे,पालघर परीसर हा रानभाज्यांनी अधिक फुलून गेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in