मुरुड येथील वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांना फॉरेस्ट कस्टडी

मुरुडपासुन अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या फणसाड अभयारण्याचे क्षेत्रफळ ५४ चौरस किलोमीटरमध्ये व्याप्त आहे
मुरुड येथील वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांना  फॉरेस्ट कस्टडी

मुरुड तालुक्यामधील फणसाड अभयारण्यात वन्यजीवांची शिकार करण्यासाठी आलेल्या सात जणांना पकडण्यात आले असून या सर्वांना मुरुड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर या सर्वांना हजर केले असता त्यांना तीन दिवसाची फॉरेस्ट कस्टडी देण्यात आली आहे.

मुरुडपासुन अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या फणसाड अभयारण्याचे क्षेत्रफळ ५४ चौरस किलोमीटरमध्ये व्याप्त आहे. फणसाड अभयारण्यात विविध वन्यजीव प्रमाणे अनेक सरपटणारे प्राणी व वन ओषधी वृक्षांची धनसंपदा आहे. या अभयारण्यात वन्य प्राण्यांमध्ये बिबटया, रानमांजर, सांबर, वानर, भेकर, रानडुक्कर, साळींदर, रानगवे, पिसोरी, व मोठी खार अर्थात शेकरु, ससा, डुक्कर आदींचा समावेश आहे. रात्रीच्या समयी वन्यजीवांची शिकार करण्याच्या बेताने दिनांक २४ जून २०२२ रोजी रात्रीच्या समयी मंगेश विष्णू वाघमारे (वय २५), सोमनाथ गजानन वाघमारे (वय २३) हे दोघे राहणार उसरोली ग्रामपंचायत मधील बेलीवाडी येथे राहणारे आहेत. मछिंद्र दशरथ वाघमारे (वय २६) सुमरादेवी परिसरात राहणार आहे.

दीपक मनोज पाटील (वय १८) प्रथमेश प्रकाश ठाकूर (वय २१) हे दोघेही शिरगाव येथे राहणारे तर चेतन भास्कर खानावकर (वय २५) व प्रज्वल हेमंत रोटकर (वय २२) हे दोघेही राहणार साळाव यांनी फणसाड अभयारण्यातआले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in