बंद झालेले कारखाने गुजरातला जाऊ देणार नाही - उदय सामंत

महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पाची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
बंद झालेले कारखाने गुजरातला जाऊ देणार नाही - उदय सामंत

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ येथील बंद झालेले कारखाने गुजरातला जाऊ देणार नाही. जर काही कारखाने आजारी झाले असतील तर त्यांना पुन्हा नव्याने ऊर्जा देण्याचे काम प्रशासनातर्फे करण्यात येईल. गर्व से कहो हंम हिंदू है हा नारा मुख्यमंत्र्यांनी आता अचानक दिलेला नाही. हा नारा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता, मात्र गेल्या अडीच वर्षात हा नारा काही जण तो नारा विसरले आहेत. महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पाची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

पुढे बोलताना मंत्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला आहे की उद्योजकांच्या प्रगतीसाठी व त्यांना बळ देण्यासाठी तुम्ही जो शब्द द्याल तो मी दिला आहे असे समजेन व आपण तो पूर्ण करू असे सांगितले. एक संकल्प करत असल्याचे सांगत महाराष्ट्रातील उद्योजकाला कुठलाही त्रास होणार नाही हे उद्योग खात्यातील अधिकाऱ्यांनी आपली जबाबदरी समजून काम केले पाहिजे त्यावर आमचे नियंत्रण देखील असेलच. उद्योजकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उद्योजकांची एक समिती स्थापन केली जाईल व लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in