ठाणेकर मुख्यमंत्र्यांच्या काळात फ्री वेच्या विस्ताराला संजिवनी मिळणार का ?

प्रकल्पांची आढावा बैठक तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जानेवारी २०२०मध्ये घेतली होती
ठाणेकर मुख्यमंत्र्यांच्या काळात फ्री वेच्या  विस्ताराला संजिवनी मिळणार का ?

गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहर आणि परिसर वाहतूककोंडीच्या गर्तेत सापडला आहे. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी मानखुर्द येथे अर्ध्यावर सोडण्यात आलेल्या फ्री वेचा विस्तार पुढे मुलुंड आणि घोडबंदरपर्यंत करण्याची घोषणा दोन वर्षापूर्वी तत्कालीन नगरविकासमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र अमलबजावणी संथ गतीने सुरु आसल्याने हा महत्त्वाचा प्रकल्पही रखडल्याचे उघड झाले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात ठाणेकर वाहतूककोंडीत अडकला असताना ठाणेकर मुख्यमंत्र्यांच्या काळात फ्री वेच्या विस्ताराला संजिवनी मिळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांची आढावा बैठक तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जानेवारी २०२०मध्ये घेतली होती. यावेळी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत. ईस्टर्न फ्री वे सध्या मानखुर्द येथे येऊन संपतो, परंतु त्यापुढे मुलुंड–ठाण्याच्या दिशेने मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा फ्री वे मुलुंडपर्यंत आणि दक्षिणेला जीपीओपर्यंत वाढवण्यासंदर्भात पावले उचलण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले होते. ठाण्यातून जाणारा महामार्ग, तसेच घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी साकेत-गायमुख कोस्टल रस्त्याचे नियोजन असून हा रस्ता एमएमआरडीएने करावा आणि विस्तारित फ्री वे या रस्त्याला जोडावा, असे निर्देशही शिंदे यांनी तेव्हा दिले होते. ठाण्यातील तीन हात नाका येथे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटर प्रकल्पाची आखणी ठाणे महापालिकेने केली, असून या प्रकल्पासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी देण्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली होती. तसेच याच बैठकीत कोपरी-पटणी खाडी पुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही दिले होते.

मुंबईकडून दररोज पुणे, बंगलोर, नाशिक,अहमदनगर, बोरीवली, वसई, विरार आणि अहमदाबाद महामार्गावर जाण्यासाठी ठाण्यातून एकच रस्ता जातो. मुंबई टोलनाक्यापर्यंत रस्ता सहा पदरी असल्याने येतांना वाऱ्याच्या वेगाने वाहने येतात, मात्र टोलनाका संपवून ठाणे शहरात प्रवेश करताच वेगावर मोठी मर्यादा घालावी लागते. मार्गिका कोपरी पुलावर अरुंद होत असल्याने या परिसरात मोठी कोंडी होते त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या कोपरी पुलाचे रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. तसेच आद्यपही कामाची गती संथ असल्याने ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका कधी होणार हे कुणीही सांगू शकत नाही.

तीन हात नका परिसर झाला

वाहतूककोंडीचे आगार

ठाण्यात प्रवेश करतानाच आनंद नगर टोल नाका पार करताना प्रवाश्यांचा वेळ वाया जातो त्यात भर म्हणून की काय एमएमआरडीएच्या ढिसाळ नियोजनामुळे दशकापासून कोपरी पुलाचे रखडलेले विस्तारीकरणाचे काम आता सुरु झालेले असले तरी खूपच संथ गतीने सुरु आहे त्यामुळे कोपराच्या पुढील सर्वच चौक २४ तास वाहतूक कोंडीत असतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in