लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलेची गळा चिरून हत्या, प्रियकर फरार

पोलिसांनी फरार झालेल्या प्रियकराचा शोध सुरू केला आहे.
लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलेची गळा चिरून हत्या, प्रियकर फरार

भिवंडी: नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरातील किचनमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील गणेशनगर (शाम बाग) मधील एका घरात घडली आहे. मात्र तिच्यासोबत राहणारा प्रियकर फरार झाला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फरार झालेल्या प्रियकराचा शोध सुरू केला आहे.

शबीर असे हत्या करून फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर मधु प्रजापती (३५) असे मृतक महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मधु आणि शबीर हे अंबरनाथ शहरातील एका कंपनीत कामाला होते. त्यावेळी दोघांची ओळख होऊन प्रेमाचे सूत जुळल्याने दोघांमध्ये अनैतिक संबध निर्माण झाले. त्यानंतर या दोघांनी भिवंडी तालुक्यातील कोनगाव भागात गणेश नगर (शाम बाग) येथील राजपूत निवासमधील तळ मजल्यावरील खोली भाड्याने घेऊन त्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. विशेष म्हणजे काही महिने मृतकची मैत्रीण अनितासोबत राहत होती. दरम्यान १८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास खोलीतून दुर्गंधी येत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी कोनगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता घरातील किचनमध्ये मृतदेह आढळून आला. मृतदेह डी कंपोज असल्याने पुढील उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात पाठवला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीप बने करीत आहेत.

आरोपीच्या शोधात कोनगाव पोलिसांचे दोन पथक तर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला असून लवकरच आरोपीला पकडले जाईल. त्यानंतरच मधुच्या हत्येचे कारण समोर येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in