महिलांनी उद्योगातही लक्ष घालावे- आमदार क्षितिज ठाकूर

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मुणून माजी महापौर प्रविणा ठाकूर, माजी महापौर रुपेश जाधव, माजी सभापती भरत मकवाना आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महिलांनी उद्योगातही लक्ष घालावे- आमदार क्षितिज ठाकूर

वसई : "आजची महिला ही समाजसे मध्ये हिरिरीने भाग घेत आहे. आपला उत्कर्ष करण्याकडे तिचा कल आहे. या महिलांनी आता छोट्या मोठ्या उदयॊगाकडे वळावे. ज्यातून त्यांना आणि कुटुंबीयांना आर्थिक हातभार लाभू शकेल", असे प्रतिपादन नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी नालासोपारा येथे बहुजन विकास आघाडीतर्फे आयोजित केलेल्या कार्यकर्ता स्नेह संमेलन व महिला मेळावामध्ये बोलताना केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मुणून माजी महापौर प्रविणा ठाकूर, माजी महापौर रुपेश जाधव, माजी सभापती भरत मकवाना आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बहुजन विकास आघाडीतर्फे नालासोपारा पूर्वेला शनिवारी, १० फेब्रुवारी रोजी असलेल्या ठाकूर विद्यालयात झालेल्या स्नेहसंमेलनात वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर गेली ३० वर्ष काम करणाऱ्या ५० कार्यकर्त्यांचा यावेळी क्षितिज ठाकूर आणि माजी महापौर प्रविणा ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in