पाणी प्रश्न महिलांचा मोर्चा ; एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या उपोषणाची दाखल घेऊन मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सोनावणे यांची भेट घेतली होती
पाणी प्रश्न महिलांचा मोर्चा ; एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

देशमुख होम्समधील महिलांनी मंगळवारी एमआयडीसीच्या पिंगारा स्थित पंप हाऊसवर मोर्चा काढला. भर पावसात महिला मोठया संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाची दखल घेत एमआयडीसी अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांबरोबर चर्चा केली.

देशमुख होम्स मधील रहिवासी तथा समाजसेविका वंदना सोनावणे यांनी काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण केले होते. येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या उपोषणाची दाखल घेऊन मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सोनावणे यांची भेट घेतली होती. सदर प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले होते. पाणी प्रश्न बूस्टर हे कारण असल्याचे समाजसेविका वंदना सोनावणे यांनी सांगितले होते. आपल्या हक्काचे पाणी इतर ठिकाणी वळविण्यात आल्याचा आरोप सोनावणे यांनी केला. एमआयडीसीच्या पिंगारा स्थित पंप हाऊसवर मंगळवारी येथील महिलांनी मोर्चा काढला. महिलांनी मोर्चा काढल्याचे समजताच मानपाडा पोलिसांनी मोर्चेकरी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पुढे एमआयडीसी अधिकारी, पोलीस आणि मोर्चेकरी यांच्यात चर्चा झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in