दहिसर-भाईंंदर लिंक रोडचे काम रखडले; नगरविकास विभागाची मान्यता मिळालीच नाही!

मीरा-भाईंदर सोबतच व वसई-विरार शहरांनाही सदरील प्रकल्प जोडणार आहे. त्यासाठी पुढे जाऊन तो रस्ता नायगाव- भाईंदर या सहा पदरी प्रकल्पाला मिळणार आहे. त्यामुळे भाईंदर ते नायगाव फक्त १० मिनिटात प्रवास होणार आहे.
दहिसर-भाईंंदर लिंक रोडचे काम रखडले; नगरविकास विभागाची मान्यता मिळालीच नाही!

भाईंंदर : दहिसर-भाईंदर लिंक रस्त्याचे काम रखडले आहे. मुंबई शहरातून मीरा-भाईंदर व वसई-विरार शहरात जाण्यासाठी महत्त्वाचा असणारा रस्ता प्रकल्प असणारा दहिसर ते भाईंदर लिंक रोड हा महत्त्वाचा असलेला प्रकल्प व भविष्यात शहराची वाहतूककोंडी फोडणारा लिंक रस्ता असणारा प्रकल्प नगरविकास विभागाची लिंक रस्ता लाईन आऊटची मान्यता नसल्याने प्रकल्प रखडला आहे. मीरा-भाईंदर सोबतच व वसई-विरार शहरांनाही सदरील प्रकल्प जोडणार आहे. त्यासाठी पुढे जाऊन तो रस्ता नायगाव- भाईंदर या सहा पदरी प्रकल्पाला मिळणार आहे. त्यामुळे भाईंदर ते नायगाव फक्त १० मिनिटात प्रवास होणार आहे.

दहिसर-भाईंदर लिंक २२०० कोटींची रस्ता कामाची निविदा काढण्यात आली असून, त्याचे कार्यादेश एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहेत. मात्र मीरा-भाईंदर महानगरपालिका परिसरात लिंक रोड रस्ता विकास आराखड्यात प्रस्तावित नसल्याने त्याची महापालिकेने तसा ठराव करून शासनाच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविलेला असतानाही तो प्रस्ताव तसाच धूळखात पडल्याने लिंक रोड रस्त्याचे काम अजूनपर्यंत रखडलेले आहे.

एल अँड टी कंपनी ठेकेदारांना दिलेल्या कार्यादेशा नुसार संपूर्ण प्रकल्प हा ५.३ किलोमीटर असून, सदरील लिंक रस्ता प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पुढील तीन वर्षाचा कालावधी आहे.

भाईंदर-नायगाव प्रकल्पाची अद्याप निविदा नाही

भाईंदर ते नायगाव या खाडीवरून जाणारा सहा पदरी लिंक रस्त्याला मंजुरी मिळाली असून, मात्र, तांत्रिक अडचणींमुळे मागील काही वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. नायगाव, वसई, नालासोपारा, विरार या शहरांतून लाखो लोक दररोज कामानिमित्त मुंबईला जात असतात. शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी व कामगारांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यासाठी या सर्वांना दुसरा मार्ग नसल्यामुळे लोकलवर अवलंबून राहावे लागते अन्यथा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ने मुंबईला प्रवास करावा लागतो, तसेच दहिसर टोलनाका येथे वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. त्यामुळे वेळ व इंधन दोन्ही वाया जाऊन वाहतूककोंडी होत असते. त्याचीही अद्याप निविदा निघालेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in