किरकोळ कारणावरून कामगाराची मालकाला मारहाण

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली
किरकोळ कारणावरून कामगाराची मालकाला मारहाण

उल्हासनगर : मालक आणि कामगार यांच्यात झालेल्या किरकोळ कारणावरून कामगाराने मालकावरच हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

उल्हासनगर कॅम्प ५ परिसरात गांधी रोड येथील हॉली फॅमिली हायस्कूल समोर नदीम शेख यांचा ॲम्ब्राॅयडरीचा कारखाना आहे. सकाळी मालक नदीम शेख आणि त्यांचा कामगार नितीन यादव यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाले होते. संध्याकाळी नितीन यादवने त्याचा भाऊ बादल यादवला सोबत घेऊन नदीम शेख याच्यावर कारखान्यात घुसून हल्ला केला. या हल्यात नदीम शेख जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in