Untitled Jan 13, 2024 10:41 am

मृत भलबद्र यादव हे गुरुवारी सायंकाळी खडीपासून पावडर बनवण्याचे काम करत असताना त्यांचा अचानक तोल गेल्याने ते खडी यंत्रात पडले.
Untitled Jan 13, 2024 10:41 am

ठाणे : खडी यंत्रामध्ये पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी नागलबंदर परिसरात घडली आहे. भलबद्र यादव (४०) असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे. काम करत असताना कोणत्याही प्रकारची सुरक्षेची साधने नसल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले असून याप्रकरणी संबंधित मालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास कासारवडवली पोलीस करत आहेत.

मृत भलबद्र यादव हे गुरुवारी सायंकाळी खडीपासून पावडर बनवण्याचे काम करत असताना त्यांचा अचानक तोल गेल्याने ते खडी यंत्रात पडले. यादव या यंत्रात पडल्याचे लक्षात आल्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. खाजगी आणि त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र शासकीय रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. भलबद्र हे त्यांची पत्नी, तीन मुली आणि एका मुलासोबत नागलबंदर परिसरातच राहत होते.

logo
marathi.freepressjournal.in