डोंबिवलीतील खांबाळपाड्यातील रस्ता बनतोय यमदूत

दोन अपघात! जीव धोक्यात टाकून प्रवास, संतप्त रहिवाशी आयुक्तांना विचारणार जाब
डोंबिवलीतील खांबाळपाड्यातील रस्ता बनतोय यमदूत

डोंबिवली : कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेने स्मार्ट सिटी बनल्याचा ढोल बडवीत असले तरी शहरातील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, रस्त्यांची दुरावस्था, व्हेटीलेटरवर असलेली आरोग्य व्यवस्था, खुळखुळीत झालेली परिवहन व्यवस्था वस्तुस्थिती दाखवीत आहे. प्रशासकिय राजवट असल्याने नागरी समस्यां सोडविण्याकडे चालढकल करणाऱ्या प्रशासनाला `स्मार्ट सिटीचा सुव्यवस्थित रस्ता` अद्याप सापडत नाही. डोंबिवली पूर्वेकडील खांबळपाडा येथील रस्ता यमदूत बसल्याची अवस्था समोर आली आहे. या रस्त्यावर दोन अपघातानंतरही प्रशासन का लक्ष देत नाही असा प्रश्न येथील रहिवाशाना पडला आहे.गेली दोन वर्ष जीव धोक्यात टाकून वाहने चालवावी लागत असल्याने अपघातात जीव गेल्यावर रस्ता होईल का असा प्रश्न संतप्त रहीवाशांनि उपस्थित केला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील खांबाळपाडा येथील मॉडेल महाविद्याजवळील अंबरविस्ता, मंगलमूर्ती आणि सर्वोदय या इमारतीसमोरील मंजूर रस्ता दोन वर्षापासून रखडला आहे. घरे खरेदी करताना विकासकाने रस्ता तयार होईल असे आश्वासन येथील रहीवाशांना दिला होता. मात्र येथील रस्त्यावर दोन अपघात होऊनही विकासक आणि प्रशासनाक्डून रस्त्या झाला नाही असे रहिवाशांचे म्हणणे आहे.येथील रस्त्यावर पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचत असून शाळकरी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीकांना रस्त्यावरून चालत जावे लागते. रस्त्यावर खड्ड्यांचे समाज्र्य पसरल्याने रिक्षाचालक या रस्त्यावरून जाण्यास नकार देतात. दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात येथील रहिवाशांनी मंजूर रस्ता कधी होणार असा प्रशासनाला विचारला होता. मात्र वेळकाढू भूमिका निभावीत पालिका प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी पत्रकारांशी बोलताना केला.

याबाबत स्थानिक नागरीक संदीप चौधरी म्हणाले, घर घेताना विकासकाने रस्ता करून देतो असे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्ष उलटली तरी रस्ता बनविला नाही. दीपक चव्हाण म्हणाले, विकासाने घर देताना रस्त्या करून देऊ असे सांगितले होते. माजी नगसेवक साई शेलार यांच्या प्रयत्नाने या रस्त्यावर पथदिवे लावण्यात आले होते.आम्ही सातत्याने रस्त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. पुढील दिवाळीपर्यत रस्ता होईल असे आश्वासन प्रशासनाकडून दिले जात आहे. अंबरविस्ता ते भोईरवाडी पर्यत लहानमुले, ज्येष्ठ व्यक्ती यांना रस्त्यातून चालताना त्रास होत असतो. कच्चा स्वरूपाचा रस्त्या करून देतो असे सांगतात. उन्हाळ्यात पालिकेच्या संबधित विभागाने पाहणी केली होती.रस्त्यावर चिखल झाल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या रस्त्यवर गुडघाभर पाणी साचते.रस्त्यावर चिखल आणि खड्डेच खड्डे असल्याने वाहन चालविताना बैलगाडी चालवीत असल्यासारखे वाटते असे वाहनचालक सांगतात.

पावसाळ्यात रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी करण्याची मागणी..

उन्हाळ्यात पालिकेच अधिकारी वर्ग, भाजपा जिल्हाअध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक साई शेलारयांसह पदाधिकारी राजू शेख यांनी सदर रस्त्याची पाहणी केली होती.दोन –तीन महिन्यात रस्ता होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र तोपर्यत या या रस्त्यावरून वाहने चालविताना अपघात होण्याची शक्यता असून यावर मात्र प्रशासनाने लक्ष दिले नसल्याचे दिसते.पाहणी करायची असेल तर पावसाळ्यात करावी म्हणजे वस्तुस्थिती दिसेल असे रहिवाशी म्हणतात.

दोन अपघात होऊनही रस्ता बनला नाही..

शहरातील मुख्य रस्त्यावर वाहने चालविण्यासाठी प्रशासनाकडून उत्कृष्ठ दर्ज्याचे रस्ते बनविले जात असल्याचे सांगितले जाते. मात्र मंजूररस्त्या अनेक वर्ष रखडत असेल तर प्रशासनाकडून विलंब का केला जातो अस प्रश्न स्थानिक रहीवाशांना पडला आहे. या रस्त्यावर दोन अपघात झाले असून अजून किती अपघात झल्यावर हा रस्त्या होऊल असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

याबाबत पालिकेचे उपअभियंता विनय विसपुते यांना विचारले असता ते म्हणाले. हा रस्ता डीपी प्लॅॅन येत असून त्याचे रुंदी २४ मीटर आहे. या रस्त्याचे काँक्रीटकरण होणार असून ते काम एमएमआरडीएच्या माध्यमातून केले जाणार आहे. पालिका एवढा मोठा निधी खर्च करणे शक्य नसल्याने शहरातील मुख्य डीपी प्लॅॅनमधील रस्ते एमएमआरडीए करत आहे. हा रस्ता एमएमआरडीएच्या माध्यमातून लवकरच होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in