Thane News : येऊरमध्ये मालवाहू वाहनांना नोंदणीशिवाय ‘नो एंट्री’; ठाणे मनपामार्फत कठोर निर्बंध

ठाणे महानगरपालिकेने येऊर वनक्षेत्रात बांधकाम साहित्याच्या वाहतुकीवर कठोर निर्बंध लादले आहेत. यापुढे, पालिकेची पूर्वपरवानगी आणि वनविभागाकडे नोंदणी केल्याशिवाय बांधकाम साहित्य येऊरमध्ये घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नरेंद्र गुप्ता/ठाणे

ठाणे महानगरपालिकेने येऊर वनक्षेत्रात बांधकाम साहित्याच्या वाहतुकीवर कठोर निर्बंध लादले आहेत. यापुढे, पालिकेची पूर्वपरवानगी आणि वनविभागाकडे नोंदणी केल्याशिवाय बांधकाम साहित्य येऊरमध्ये घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेकडून परवानगी घेणे आणि वनविभागाच्या तपासणी नाक्यावर (चेक पॉइंट) आवश्यक साहित्याची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती एका पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. त्याचबराबेर येऊर हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे आणि येथील कोणत्याही बांधकामासाठी ठाणे महानगरपालिकेच्या नगरविकास विभागाची मंजुरी आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

ज्यांना परवानगी दिली जाईल, त्यांना वापरल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्याचा प्रकार आणि वाहनांची सविस्तर माहिती वनविभागाच्या प्रवेशद्वारावरील तपासणी नाक्यावर द्यावी लागेल.

गेल्या काही वर्षांत, पालिकेने येऊरमधील विविध उल्लंघनांसाठी १८८ जणांना नोटीस बजावली आहे. तसेच, पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून लाऊडस्पीकर वापरणे आणि फटाके फोडल्याबद्दल १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सर्व अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचे सर्वेक्षण सुरू आहे. अतिक्रमण विभाग, नगरविकास विभाग आणि मालमत्ता कर विभाग संयुक्तपणे प्रत्यक्ष पाहणी करून, कोणत्या उद्देशासाठी बांधकामांना परवानगी दिली होती, याची पडताळणी करत आहेत.

दिनेश टायदे, उपायुक्त

logo
marathi.freepressjournal.in