पाणीप्रश्नावर श्रमजीवी रस्त्यावर; पालघर १८, तर ठाणे जिल्ह्यात २१ ग्रामपंचायतींवर धडक

केंद्र आणि राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असून, १५ व्या वित्त आयोग व पेसामधून ही पाणीपुरवठासाठी खर्च होणार आहे. प्रत्येक गावात २ कोटी रुपयांपासून १० कोटींपर्यंतचा निधी आलेला आहे; मात्र या योजना आजपर्यंत पूर्णत्वास नाहीत.
पाणीप्रश्नावर श्रमजीवी रस्त्यावर; पालघर १८, तर ठाणे जिल्ह्यात २१ ग्रामपंचायतींवर धडक

वसई : ठाणे व पालघर जिल्ह्यात पाणीप्रश्नावर श्रमजीवी संघटनेने रान पेटवले असून, सोमवारी या वणव्याचे चांगलेच चटके अधिकारी आणि ठेकेदारांना बसलेले पाहायला मिळाले. ठाणे जिल्ह्यात २१ तर पालघर जिल्ह्यात तब्बल १८ ग्रामपंचायतींवर धडक मोर्चे आयोजित करून भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलाच दणका देण्याचे काम आज श्रमजीवी संघटनेने केले आहे. ग्रामपंचायत कार्यालयावर काढलेल्या मोर्चात रिकामे हंडे घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी सोमवारी अधिकाऱ्यांना जाब विचारत आमच्या घरात झोपडीत नळाचे स्वच्छ आणि मुबलक पाणी कधी येणार याबाबत लेखी घेतले.

४ सप्टेंबर २०२०च्या शासन निर्णयानुसार, तालुक्यातील प्रत्येक गावातील राहणाऱ्या सर्व कुटुंबातील घरात, बंगल्यात, घरकुलात, झोपडीत, झापात नळाने पाणीपुरवठा मिळालेच पाहिजे, अशी योजना आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असून, १५ व्या वित्त आयोग व पेसामधून ही पाणीपुरवठासाठी खर्च होणार आहे. प्रत्येक गावात २ कोटी रुपयांपासून १० कोटींपर्यंतचा निधी आलेला आहे; मात्र या योजना आजपर्यंत पूर्णत्वास नाहीत. याबाबत गेले अनेक दिवस गावागावात जाऊन जनजागृती करण्याचे काम श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते करत होते. सोमवारपासून १० तारखेपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संघटनेने पाण्याच्या प्रश्नावर एक चळवळ सुरू केली आहे. या हंडा मोर्चाचे नेतृत्व त्या त्या भागातील श्रमजीवी संघटनेचे गाव विभाग स्तरावरील गवकमिटी तसेच झोन कमिटी प्रमुखांनी केले, तर राज्य जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मोर्चाने भेटी देऊन लढवय्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले.

logo
marathi.freepressjournal.in