

डॉ. सविता महाडिक
ज्योतिष भूषण
धनु
'नवे व्यावसायिक करार मदार'
धनु ही अग्नितत्त्वाची राशी आहे. ही भाग्य स्थान ज्योतक राशी आहे. त्याचप्रमाणे ही गुरूची राशी असल्यामुळे या राशीवर गुरूचे कार्यकर्ते आढळते. स्वभाव तापट असतोच पण स्वार्थीही असतो. शीघ्रकोपी असतात, धाडस, कामातील वेग, दयाळूपणा ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आढळून येतात. या राशीचे चिन्ह अर्धा घोडा अर्धा मनुष्य तोही धनुष्यबाण घेतलेला असे आहे. कुलश्रेष्ठ, श्रीमान प्राज्ञ, यशस्वी, धनवान, नीतिमान, शूर, उदार, सात्विक, कुटुंबप्रमुख, निधड्या व बेडरूमवृत्तीचा ही वैशिष्ट्ये धनु राशींच्या जातकांमध्ये असतात व त्यांची पित्त प्रकृती असते.
शिक्षण : शिक्षणासाठी सदरचा कालावधी आपणास अत्यंत अनुकूल आहे. त्याप्रमाणे अनुकूल वातावरणही मिळणार आहे. थोड्याच प्रयत्नामध्ये आपण आपले यश खेचून आणू शकाल. कोणत्याही क्षेत्रात आपल्याला यश मिळणार आहे. कला व क्रीडा क्षेत्रातही चांगली कामगिरी होईल. परदेशातील शिक्षणासाठी मात्र जास्त प्रयत्नांची आवश्यकता आहे. योग्य दिशेने प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यास आपल्याला योग्य ते मार्ग सापडतील. योग्य प्रयत्नांना चांगले यश मिळू शकते हे लक्षात ठेवा.
पारिवारिक : कुटुंबात आपल्याला थोडे शिस्तीचे वातावरण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा लहान-मोठ्या कारणांनी कार्याला विलंब होण्याची शक्यता आहे तसेच विनाकारण वादविवादाचे प्रसंग येऊ शकतात. ते थांबविण्यासाठी आपणास काही निर्णय घ्यावे लागतील. निर्णय घेण्यामध्ये आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा आपण पूर्ण करू शकाल. मुला-मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.
नोकरी-व्यवसाय-धंदा : व्यवसाय, धंद्याच्या दृष्टिकोनातून सदरचा कालावधी जास्त अनुकूल राहील. नवीन व्यावसायिक करारमदार होऊ शकतात. परदेशी संबंध येऊ शकतो. व्यवसायातील दीर्घकाळ रखडलेली वादग्रस्त येणे वसूल होतील. व्यावसायिक आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. व्यवसाय, धंद्यात पूर्वीच्या काळी काही कायदेशीर समस्या उभ्या राहिल्या होत्या. त्या समस्या आता संपुष्टात येतील. कायदेशीर बाजू आपल्या बाजूने राहील, मात्र उत्तरार्धात कोणतेही आर्थिक व्यवहार ते लहान असो किंवा मोठे सावधानतेने करणे हिताचे ठरेल. फसवणुकीची शक्यता आहे. अगोदर सर्व कामाची खात्री करून घ्या आणि मग त्या कामात हात घाला किंवा जबाबदारी स्वीकारा. आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात भरपूर सफलता प्राप्त होईल. आपण आपली क्षमता ओळखन आपल्या कार्यात श्रेष्ठता मिळवाल. खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या जातकांची वरिष्ठाबरोबर संबंध सुधारतील. आपण केलेल्या कार्याची प्रशंसा होईल. एखादी नवीन कामगिरी सोपविली जाऊ शकते. आपल्या आत्मविश्वासात, उत्साहात वृद्धी होईल. आर्थिक आलेख उंचावेल. परदेशगमनाची शक्यता. आपल्या उत्पन्नाचा बराचसा भाग स्थायी संपत्तीमध्ये गुंतवाल. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत परत आपल्या मूळ ठिकाणी येण्याची संधी मिळेल.
शुभ दिनांक : २, ३, ४, १०, ११, १३, १४,१८,१९,२२,२६,२८,२९,३०
अशुभ दिनांक : ५,७,१५,१६,१७,२०
मकर
'वैयक्तिक सुवार्ता मिळतील'
मकर ही अर्थत्वाची रास आहे, तसेच ती पृथ्वीतत्त्वाची पण रास आहे. या राशीचा स्वामी शनि महाराज आहेत. मकर राशीचे चिन्ह हे मगर आहे. त्यामुळे मगरीच्या स्वभावातील गुणदोष मकर रास असलेल्या व्यक्तींमध्ये आढळतात. या राशीचे चिन्ह मगर आहे व तोंड हरणासारखे व शरीर मगरीसारखे आहे हे या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. धूर्तता हे या राशीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. स्वभाव शांत, निश्चयी, शोषिक व स्वाभिमानी आहे. या राशीच्या व्यक्ती व्यवहार चतुर असतात. त्याचप्रमाणे लबाड व स्वार्थी असतात. राजकार्य कुशल असतात. मकर रास असलेल्या जातकांची वातप्रकृती असते. सम व सौम्य राशी असून ही स्त्री रास आहे.
शिक्षण : या कालावधीमधील ग्रहमान शिक्षणासाठी अनुकूल आहे. आपले प्रयत्न हे चांगले होणार आहेत. कष्टाचे चांगले फळ मिळेल. कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील. त्याचप्रमाणे प्रसिद्धी लाभेल. एखादी मोठी संधी मिळू शकेल. एकूण सर्वच क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूलता लाभणार आहे. परदेशगमनासाठी अनुकूलता लाभेल. परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल. आपल्या प्रयत्नांना चांगल्या प्रकारे यश लाभणार आहे. हे लक्षात ठेवून प्रयत्नामध्ये कमी पडू देऊ नका.
पारिवारिक : कुटुंबामध्ये आपल्याला काही वेळेस अतिरिक्त जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे व पुढाकार घेऊन कुटुंबातील व्यक्तींना अथवा सदस्यांना योग्य मार्गदर्शन करावे लागणार आहे. काही महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घ्यावे लागतील. घरात काही गोष्टींसाठी संभ्रम निर्माण होऊ शकतो. संभ्रमित अवस्थेत निर्णय होण्याची शक्यता असल्याने निर्णय चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मन शांत ठेवून पूर्ण विचारांती निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. निर्णय पुढे ढकलता येणार असतील तर ते पुढे ढकलावेत. बाकी आर्थिक स्थिती चांगली राहील.
नोकरी-व्यवसाय-धंदा : सध्याचा कालावधी अनुकूल असल्या कारणाने मागील काळात ज्या काही समस्या होत्या त्या आता राहणार नाहीत. वैयक्तिक सुवार्ता मिळतील. त्यामुळे आपल्या अंगात उत्साह व चैतन्य भरलेले असेल. आपल्या हातातील कामे आपण जलद गतीने पूर्ण करून नवीन कामे हाती घ्याल. कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा कराल. सतत कार्यात मग्न राहाल. त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल. आपल्या उत्पन्नात वाढ होईल. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुदृढ बनेल. आपण घेतलेले निर्णय अचूक ठरल्यामुळे त्याचाही फायदा होईल. सतत व्यावसायिक आर्थिक ओघ चालू राहील. व्यावसायिक दीर्घकाळ रखडलेली उधारी वसूल होईल. व्यवसाय, धंद्यात काहीतरी नवीन करण्याची इच्छा असेल त्याप्रमाणे नवीन संकल्पना राबवू शकाल. या कामात आपल्याला इतरांची मदत घेता येईल. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रातील रखडलेली सरकारी कामे गतिशील होऊन स्वप्रयत्नाने पूर्ण करू शकाल. त्यासाठी जास्तीचा खर्च तसेच वेळ द्याल. कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीपर वार्ता मिळतील.
शुभ दिनांक : २, ३, ४, ११, २१, २२, २३, २८, २९, ३०
अशुभ दिनांक : ५, ७, १५, १६, १७, २०