

डॉ. सविता महाडिक
ज्योतिष भूषण
मिथुन
"कलाकारांचे भाग्योदय"
मिथुन रास ही वायु तत्त्वाची रास आहे. तसेच मिथुन रास ही पुरुषप्रधान राशी आहे. अनेक विषयांची माहिती मिथुन रास असलेल्या व्यक्तींना असते. या व्यक्तींना बोलण्याची कला चांगल्या प्रकारे अवगत असते. या राशीचा स्वामी बुध आहे. उत्साह नवनिर्मिती चैतन्य जीवनशक्ती आकलन शक्ती यांची चांगली असते. काही प्रमाणात भोग सक्ती दिसून येते. या राशींचे चिन्ह स्त्री व पुरुष युगुल आहे. भावंडांवर प्रेम करणारा दयाळू श्रीमान भोगी गुणी तत्त्वज्ञ सुदैवी योगशास्त्राची आवड असणारा सुजन प्रिय मानी दानशूर रोगी दीर्घसूत्री म्हणजे चेंगट शत्रूचा पराभव करणारा मिथुन रास असलेल्या व्यक्तींच्या भुवया रेखीव असतात व त्यांची त्रिदोष प्रकृती असते.
शिक्षण : या महिन्यात कोणतेही शिक्षण घेण्यासाठी आपल्याला ग्रहमान अनुकूल आहे. त्याचा फायदा आपण उठवू शकता सर्वच क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूलता लाभणार आहे. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास अपेक्षित यश मिळू शकते. कला व क्रीडा क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अनेक संधी मिळतील. त्याचे सोने करणे आपल्यासाठी आहे. हे लक्षात ठेवावे अपेक्षित यश मिळेल. तसेच परदेशासंबंधीच्या शिक्षणासाठी पूर्णतः अनुकूलता लाभणार आहे. या कामी कुटुंबातून तसेच गुरुजनांकडून मार्गदर्शन व मदत मिळेल.
पारिवारिक: कुटुंब परिवारात वातावरण खेळीमेळीचे राहणार आहे. आर्थिक आवक चांगली राहणार आहे. त्यामुळे घरातील सर्व व्यक्तींच्या अपेक्षित गरजा पूर्ण होतील. आपण आपल्या प्रती असलेल्या घरातील जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे हाताळणार आहात व त्या पार पाडणार आहात. घरामध्ये उत्तम वातावरण असेल. त्याचप्रमाणे त्याला अध्यात्माची जोड असणार आहे. कुटुंब परिवारात एखादे लहान मोठे धार्मिक कार्य होऊ शकते. त्याचप्रमाणे धार्मिक पवित्र स्थळी सहकुटुंब सहपरिवार भेट देण्याचे योग आहेत. आपल्या हातून दानधर्म घडू शकेल.
नोकरी-व्यवसाय धंदा: या कालावधीच्या सुरुवातीपासून अनुकूल ग्रहमान असल्यामुळे सकारात्मक गोष्टी जास्त प्रमाणात अनुभवास मिळतील. कलाकारांचे भाग्योदय होतील कलाकारांच्या हातून एखादी चांगली कलाकृती तयार होईल. प्रसिद्धी व धनलाभ होईल. काहींना मानसन्मानाचे योग आहेत. निरनिराळ्या सभासमारंभाचे निमंत्रण मिळू शकते. एखाद्या कार्यक्रमात महत्त्वाचे पद भूषवू शकाल. राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना अनुकूल ग्रहमान महत्त्वाची जबाबदारी मिळेल. लोकसंग्रह वाढेल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींना स्पर्धात्मक यश मिळेल. काहींना वास्तू योग स्वतःच्या घरात प्रवेश करू शकाल. चालू नोकरीमध्ये अपेक्षित कामे झाल्याने आपणास समाधान लाभणार आहे. त्याचबरोबर नोकरीमध्ये भाग्योदय होण्याची शक्यता आहे. पदोन्नती वेतनवृद्धी मिळेल. आपल्या कार्याची प्रशंसा होऊन कौतुकास पात्र ठराल. समाजातील मान्यवरांचे आशीर्वाद लाभल्याने अथवा सहकार्य मिळाल्यामुळे चांगली प्रगती करू शकाल. कुटुंबात विवाह योग्य तरुण तरुणींचे विवाह ठरतील. घरात आनंदी वातावरण असेल.
शुभ दिनांक : २, ३, ४, १०, ११, १३, १४, १८, १९, २२, २३, २५, २६, २८, २९, ३०
अशुभ दिनांक : ५, ७, १५, १६, १७, २०
कर्क
"नूतन वास्तु प्रवेश करू शकाल"
कर्क रास ही जलतत्त्वाची रास आहे. त्याचप्रमाणे ही रास स्त्रीप्रधान राशी आहे. या राशीचा स्वामी चंद्र आहे. प्रेमळपणा या व्यक्तींच्यामध्ये असतो. सुंदर वस्त्र व अलंकार धारण करणारा धार्मिक त्याचप्रमाणे कपटी स्थूल शरीराचा भोगी सुंदर व सृजन प्रिय कंबर उंच या राशीच्या चातकांची प्रकृती कफ प्रकृती असते. कर्क राशीचे चिन्ह खेकडा आहे. या राशीच्या व्यक्ती सावकाश पण निश्चितपणे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा जाणीवपूर्वक करून आपले कार्य पूर्ण करतात; परंतु त्यांच्या स्वभावात चंचलता असते. बऱ्याचदा हे प्रवाही बनतात.
शिक्षण : आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये आपला अभ्यास शांततेने व स्थिर वृत्तीने करावयास पाहिजे खूप घाईने अथवा दुर्लक्षित करून अभ्यास करू नये. घाई टाळावी वेळेच्या आधीच अभ्यासाची सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते. त्याचप्रमाणे कुसंगत टाळणे महत्त्वाचे राहील. आपल्या अभ्यासामध्ये सातत्य असल्यास यश मनासारखे मिळवता येईल. त्यातच भाग्यवृद्धीचे योग आहेत. आपणास अभ्यासासाठी ग्रहमान अनुकूल असले तरी आपले प्रयत्न योग्य दिशेने होणे गरजेचे आहे. परदेशासंबंधी आपणास चांगले यश प्राप्त होईल. कला व क्रीडा क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.
पारिवारिक : कुटुंब परिवारातील सदस्यांसाठी अथवा त्यांच्या प्रगतीसाठी आपण सर्वस्वाचा त्याग करून कुटुंबाच्या सुखासाठी सतत प्रयत्नशील राहाल. आपल्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल. आपल्या शब्दाला वजन राहून आपल्या मताला कुटुंबातील इतर सदस्य प्राधान्य देतील. योग्य तो मान सन्मान मिळेल. घरात शांतता लाभेल आपल्या प्रयत्नांना चांगले यश प्राप्त होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी समाधानी उत्साही राहील. मनोरंजनासाठी आपण जास्तीचा खर्च करू शकाल.
नोकरी व्यवसाय धंदा : ज्या जातकांच्या मनातबरेच दिवस असलेली स्वतःच्या घराविषयीची कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते, पण त्या दृष्टिकोनातून मात्र प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. पैशाची सोय होईल वास्तू योग आहे. आपल्या स्वतःच्या मालकीच्या नूतन वास्तूमध्ये प्रवेश करू शकाल. कुटुंब परिवारात आनंदाचे वातावरण राहील. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. घरात मंगल कार्य घडेल. कुटुंब परिवारातील तरुण तरुणांचे प्रश्न मिटतील. त्यांना नोकरीच्या संधी मिळतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. कुटुंब परिवारातील शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींच्या कडून त्यांच्या प्रगतीपर बातम्या कानी येतील. मात्र आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. अशा प्रसंगांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. कलाकार खेळाडूंचे भाग्योदय होतील. परदेशी संधीसुद्धा उपलब्ध होतील. त्यांना आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल. काहींचे परदेश गमन होऊ शकते. व्यवसाय धंद्यामध्ये आपण नवीन योजना कार्यान्वित करू शकाल. नवीन करार मदार होतील. व्यवसाय धंद्यात नवीन संकल्पनांचा वापर व्यवसायासाठी पोषक ठरेल.
शुभ दिनांक : २, ३, ४, ११, १८, १९, २५, २६, २८, २९, ३०
अशुभ दिनांक : ५, ७, १५, १६, १७, २०