एप्रिल महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे एप्रिल महिना? जाणून घ्या...
एप्रिल महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य
एप्रिल महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य
Published on

डॉ. सविता महाडिक

ज्योतिष भूषण

तुळ

आरोग्याकडे लक्ष द्या

तुळ ही वायुतत्त्वाची रास आहे. त्याचप्रमाणे ती चर राशी सुद्धा आहे. या राशीवर शुक्राचे वर्चस्व आहे म्हणजेच ही शुक्राची रास आहे. तुळ राशीचे चिन्ह तराजू आहे. त्यामुळे यांच्या स्वभावात एक प्रकारचा समतोलपणा आढळतो. सारासार विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची प्रवृत्ती आढळते. त्याचप्रमाणे मिलन सारवृत्तीचे असतात. मुख व डोळे सुंदर असतात. राजप्रिय, विद्वान, धनवान, विरळ दातांचे लोकात प्रमुख शांत बुद्धीचे, चंचल, भित्र्या खेळाडूवृत्तीचे, अनेक कला जाणणारे, चांगल्या धंद्यावर उपजीविका करणारे, उंच, सडपातळ शरीर तसेच त्रिदोष प्रकृती असे गुण अथवा वैशिष्ट्य तूळ राशीच्या जातकांमध्ये आढळतात.

शिक्षण : अपेक्षित यश साध्य करण्यासाठी अथवा मिळवण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट घेण्याची आवश्यकता सध्याच्या काळामध्ये आहे. इतरत्र वेळ वाया न घालवता व वेळेचे नियोजन करून अभ्यासात सातत्य ठेवून अभ्यास केल्यास उज्ज्वल यश संपादित करता येईल, तसेच विशेषतः कुसंगती टाळणे अत्यंत महत्त्वाचे राहील. टेक्निकल क्षेत्रामध्ये आपण चांगले यश प्राप्त करू शकाल. कला व क्रीडा क्षेत्रात यश लाभेल. परदेशातील शिक्षणासाठी मात्र थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील. काही वेळेस इतरांची मदत घ्यावी लागेल व ती मदत आपल्याला उपलब्ध होईल.

पारिवारिक : सध्याच्या काळामध्ये कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढल्यासारखे वाटतील. त्यामुळे जास्तीची कामे सुद्धा करावी लागतील व त्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आपल्या घरातील मतभेद शांतपणे व चातुर्याने सोडवाल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील, परंतु घरामध्ये अनेक कारणांनी खर्चामध्ये वाढ होईल. घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करू शकाल. त्याचप्रमाणे शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी जास्तीचा खर्च होऊ शकतो.

नोकरी व्यवसाय धंदा : या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या स्वतःच्या आरोग्याविषयी सतर्क राहणे हितकारक ठरेल. पूर्वार्धामध्ये संसर्गजन्य बाधेपासून दूर राहा तसेच आरोग्यविषयक पथ्यपाणी पाळा, खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. महिलांनी विशेषतः आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. पूर्वार्धामध्ये व्यावसायिक कोंडी फुटेल. आतापर्यंतच्या आर्थिक समस्या सुटून उत्पन्नात वृद्धी झालेली अनुभवता येईल. अनेकानेक मार्गांनी धनागमन होईल. आपल्या झालेल्या उत्पन्नातील वृद्धीमुळे हितशत्रूंच्या कारवाया वाढू शकतात. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील. विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीपर वार्ता कानी आल्याने उत्साह आणि आनंदात भर पडेल. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपल्या आवडत्या क्षेत्राची निवड करता येईल. सभासमारंभाची आमंत्रणे मिळतील. मनोरंजनात्मक कार्यक्रमांकडे कल राहील. कुटुंबातील महिला आपल्या जबाबदाऱ्या पार पडतील. सामाजिक व धार्मिक कार्यात सहभाग घेण्याची इच्छा होईल. काही काळ, कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल. जास्त परिश्रम घ्यावे लागतील.

शुभ दिनांक : २, ३, ४, १०, ११, १३, १८, १९, २३, २५, २६
अशुभ दिनांक : ५, ७, १५, १६, १७, २०

एप्रिल महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य
एप्रिल महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

वृश्चिक

कला, क्रीडा इत्यादींतून यश मिळेल

वृश्चिक ही जलतत्त्वाची रास आहे. त्याचप्रमाणे ती स्थिर राशी आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे मंगळाचे कारकत्व या राशीवर आढळून येते. नावाप्रमाणेच या राशीचे चिन्ह विंचू आहे. त्यामुळे विंचवाची सर्व वैशिष्ट्ये या राशीच्या जातकांच्या स्वभावात दिसून येतात. वर शांत दिसणाऱ्या या व्यक्ती प्रतिहल्ला चढवण्यात मागेपुढे पाहत नाहीत. मानी, चिरायू, धनवान, विद्वान, क्रूरदृष्टी, अति चपळ. काही वेळा मात्र वस्तुस्थिती विसरून मूर्खासारखा वागणारा सृजन, द्वेषी, कुलश्रेष्ठ, अनेकांचा पोशिंदा, शूर व बुद्धिमान असतो. कमरेखालचा भाग बारीक असतो तसेच वृश्चिक रास असलेल्या जातकाची कफप्रकृती असते. अतिरेक, मर्म भेदकता, मनकवडेपणा हे स्वाभाविक गुण वृश्चिक राशीच्या जातकांमध्ये आढळतात.

शिक्षण : शिक्षणासाठी सदरच्या कालावधीमध्ये आपल्याला अनुकूल ग्रहमान लाभलेले आहे, त्याचा फायदा आपण घेऊ शकता, टेक्निकल शिक्षणात चांगले यश मिळेल. परंतु सातत्याने प्रयत्न हवेत. कोणत्याही क्षेत्रात यश मिळण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे अति आत्मविश्वास नको. वस्तुस्थितीची जाण ठेवून सातत्याने अभ्यास करणे व प्रामाणिकपणे कष्ट घेणे गरजेचे ठरेल. परदेशासंबंधी शिक्षणात चांगले यश मिळवू शकाल. प्रयत्न योग्य दिशेने झाल्यामुळे चांगले यश मिळेल. कला व क्रीडा क्षेत्रात चांगले नाव कमवू शकाल व आपले कर्तृत्व सिद्ध करू शकाल. तशा संधी मिळू शकतात.

पारिवारिक : कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहील. घरात अध्यात्मिक वातावरण लाभेल. त्यामुळे एकप्रकारचे समाधान कुटुंबात राहील. खेळीमेळीचे वातावरण राहून कुटुंबातील सदस्य एकमेकांची काळजी घेतील. आर्थिकदृष्टीने स्थिती चांगली राहील. समाधान व शांतपणे आपण आपला वेळ व्यतीत करू शकाल. परमेश्वराचे आभार मानायला विसरू नका.

नोकरी-व्यवसाय-धंदा : कलाकार व साहित्य क्षेत्रातील बुद्धिजीवी मंडळींना हा कालावधी अनुकूल राहील. त्यांच्या हातून दर्जेदार कलाकृती निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे प्रसिद्धीसह उत्पन्नामध्ये वाढ होईल. नवीन कामे मिळू शकतात. नवीन कामांचे करार होऊ शकतात. त्याचप्रमाणे आपल्या छंदातून आपण उत्पन्नही मिळू शकता. खेळाडूंना संधी प्राप्त होतील. त्या संधीचे सोने करणे आपल्या हाती आहे हे लक्षात ठेवावे. आपल्याला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. परदेशातूनही संधी मिळू शकतात. आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बाधा दूर होतील. पूर्वी केलेले नियोजन सफल होताना दिसेल. प्रगती करू शकाल. धंद्यात नवे पर्व सुरू होईल. उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी होईल. नवीन संकल्पना राबवू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांना अपेक्षित गोष्टी पूर्ण होताना दिसतील. अपेक्षापूर्तीचा कालावधी. पदोन्नती-वेतनवृद्धी होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. परंतु वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. अभ्यासात जास्त परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. समस्या संपुष्टात येतील. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. काहींचे ओळखीतून विवाह होतील. प्रेमप्रकरणात प्रेमीजनांमध्ये वादविवाद घडू शकतात. प्रेमप्रकरणातून चिंता उद्भवू शकते.

शुभ दिनांक : २, १०, ११, १३, १४, १९, २५, २६, २७
अशुभ दिनांक : ५, ७, १५, १६, १७, २०

logo
marathi.freepressjournal.in