

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
धनु
विशिष्ट गुप्त चिंता जाईल
धनु रास ही गुरूची रास आहे. धनु राशीचा स्वामी गुरू आहे. गुरूचे कार्यक्रम धनु राशीवर दिसते. धनु रास ही अग्नितत्त्वाची रास आहे, तसेच ती विषम रास आहे. राशीचक्रातील नवव्या क्रमांकाची धनु रास आहे. धनु राशीचा भाव विषम आहे. स्वभाव खूप आहे. सध्या ही रास पृष्ठोदयी आहे. नराधि संज्ञा पूर्वाध भाव मानव उत्तरार्ध पशु आहे. उत्तरार्ध मानवी शरीराच्या मांड्या या अवयवावर धनु राशीचे कारकत्व असते.
शिक्षण : शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रात चांगले यश मिळवण्यासाठी आपल्याला जरा जास्त कष्ट करावे लागणार आहेत याची नोंद घ्यावी. इतरत्र वेळ वाया न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल तसेच कुसंगतीपासून दूर राहा. व्यसने नकोत. गुरुजनांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. ते मिळेल, परंतु आपले प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास आपल्याला यश मिळू शकते हे लक्षात ठेवावे. कला व क्रीडा क्षेत्रातही चांगल्या संधी मिळू शकतात. परदेशासंबंधी शिक्षणासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. मदत व मार्गदर्शन मिळेल, परदेशी जाण्याचे मार्ग व तेथे जाऊन शिक्षण घेण्याचे मार्ग प्रशस्त होतील.
पारिवारिक : कुटुंबात चांगले वातावरण लाभेल, विशेषतः जोडीदाराची चांगली साथ लाभेल. आर्थिक उत्पन्न चांगले राहिल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल. कुटुंबात एखादे धार्मिक कार्य घडण्याचे अथवा नियोजन होण्याचे योग आहेत. सहकुटुंब आपण धार्मिक प्रवास करू शकाल. कुटुंबात शांतता व समाधान राहील. शुभ ग्रहमानाची साथ राहिल्यामुळे आपण महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. व्यावसायिक, आर्थिक प्रश्न सुटतील. कर्ज हवे असल्यास मिळू शकते. चालू नोकरीतील गुप्त चिंता जाईल. कुटुंबामध्ये आपल्या प्रिय व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो. स्वतंत्र व्यावसायिकांना परिस्थितीजन्य लाभ मिळतील. प्रेमिकांचे प्रश्न सुटतील, प्रेमात यश लाभेल.
नोकरी, व्यवसाय, धंदा : पूर्वार्धापासूनच वातावरणात एक प्रकारची अनुकूलता जाणवेल. एखादे काम करताना ते होणारच आहे अशी भावना मनामध्ये निर्माण होऊ शकते व तसे होईल सुद्धा, मात्र त्यासाठी प्रामाणिक कष्टांची गरज आहे. अव्याहत परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी लागेल. न कंटाळता कार्य मग्न राहावे लागेल. काही वेळेस त्यामध्ये अडचणी येऊ शकतात, पण त्या अडचणींवर आपण मात करू शकाल व आपले इप्सीत साध्य करू शकाल. आपल्या कष्टाला यश मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळतील. नवीन गुंतवणूक करताना सावधानतेने गुंतवणूक करा. फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. जाहिरातबाजीला भुलू नका. या कालावधीत आपण आपल्या हितशत्रूवर विजय मिळवू शकाल. व्यवसाय-धंद्यात स्पर्धकांवर मात देणे सहजशक्य होईल. आपण आपल्या नियोजनात सफल राहाल.
शुभ दिनांक: ४, ५, ७, ८, ९, २०, २६, ३०, ३१
अशुभ दिनांक: १०, १२, १३, १४, १७, २२, २३, २५, २७
मकर
व्यावसायिक उलाढाल वाढेल
मकर राशीचा स्वामी शनी महाराज आहेत. म्हणजेच शनीचे वर्चस्व हे मकर राशीवर असते. मकर रास ही चररास आहे. मकर रास पृथ्वी तत्त्वाची राशी असून अर्थत्वाची रास आहे. राशीचक्राच्या दहाव्या क्रमांकाची मकर रास आहे. ही रास चर रास म्हणून ओळखली जाते. या राशीचा भाव सम आहे, तसेच मकर राशीचे लिंग स्त्री आहे. स्वभाव सौम्य आहे. पृष्ठोदयी ही रास आहे. नरादी संज्ञा या राशीचा पूर्वार्ध पशू आहे. उत्तरार्ध जलचर आहे. मानवी शरीराचा गुडघे या अवयवावर मकर राशीचे कारकत्व असते.
शिक्षण : कोणतेही शिक्षण घेण्यासाठी अनुकूल कालावधी लाभलेला आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या काळात असलेल्या शुभ ग्रहांची साथ सुद्धा मिळणार आहे. त्याचा फायदा आपण घेऊ शकता. पण त्यासाठी आपल्याला आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे अत्यंत गरजेचे ठरेल. इतरत्र वेळ वाया न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आपल्या हिताचे ठरणार आहे. आपण आत्ता कष्ट केल्यास त्याची चांगली फळे आपल्याला मिळून अपेक्षित यश प्राप्त करता येईल. स्पर्धात्मक यश मिळू शकते. परदेशातील शिक्षणासाठीही अनुकूल कालावधी आहे. कला व क्रीडा क्षेत्रात आपण आपले कौशल्य सिद्ध करू शकता. तशा संधी पण मिळतील, परंतु चिकाटीने प्रयत्न चालू ठेवणे गरजेचे आहे. मैदानी खेळात चांगले यश मिळेल. शांत मनाने व सातत्याने अभ्यास झाल्यास उज्ज्वल यश मिळू शकते.
पारिवारिक : परिवारामध्ये काही वेळेस अशांतता अनुभवास येण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये मतभेद असू शकतात. लहानसहान कारणांवरून वादविवादाची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ज्या कारणांमुळे वादविवाद निर्माण होऊ शकतात त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास घरामध्ये शांतता टिकण्यास मदत होईल. सुसंवाद साधण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील, परंतु आपले निर्णय योग्य ठरतील. सहकुटुंब-मित्रमंडळींसमवेत आनंदासाठी प्रवासाची शक्यता आहे. कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते.
नोकरी, व्यवसाय, धंदा : परिवारात धार्मिक अथवा विवाहासारखे मंगल कार्य होतील अथवा त्यांचे नियोजन होईल. नातेवाईक, मित्रमंडळींच्या गाठीभेटी झाल्यामुळे आनंदी राहाल. उत्साह व चैतन्याने वातावरण समृद्ध असेल. कुटुंबातील विवाह योग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. विवाह ठरण्यामधील अडचणी दूर होतील. काहींचे प्रेमविवाह होऊ शकतात. प्रेमात यश लाभेल, कलाकार, खेळाडूंना अनुकूल कालावधी आहे, आपण ज्या संधीची वाट बघत होता अशा संधी उपलब्ध होतील त्यामध्ये परदेशातून मिळणाऱ्या संधींचाही समावेश असू शकतो. विद्यार्थी-विद्यार्थिनींना कॉलेज कॅम्पसमधून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. त्याचप्रमाणे नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी होऊ शकतात.
शुभ दिनांक: ४, ५, ७, ८, १५, २०, २२, २९, ३०, ३१
अशुभ दिनांक: १०, १२, १३, १४, १७, २२, २३, २५, २७