

तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील
कुंभ या राशीचे स्वामी शनि महाराज आहेत. म्हणजेच शनि महाराजांचे कार्यकर्ते कुंभराशीवर असते. कुंभ राशी वायुतत्त्वाची रास आहे, तसेच ही बुद्धिचातुर्याची ही रास आहे. राशीचक्रामधील अकराव्या स्थानी ही रास दर्शवली जाते. कुंभ राशीचा भाव स्थिर आहे. कुंभ राशी विषम रास असून स्वभाव क्रूर आहे. राशीचे लिंग पुरुष आहे. ही रास शिर्षोदयी आहे. संज्ञा नर आहे. ही राशी द्विपाद राशी आहे. मानवी शरीराचा पोटऱ्या य अवयवावर कुंभ राशीचे कार्यकत्व असते.
शिक्षण : सध्याच्या कालावधीमध्ये अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे आपल्याला थोडे जड जाणार आहे. त्याचे कारण आपले स्वतःचे मन अशांत राहू शकते. त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी व तो केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रयत्न योग्य दिशेने व्हायला पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळेल. बुद्धितत्त्वाची रास असल्याकारणाने व त्याला प्रयत्नांची जोड मिळाल्यास अतिशय चांगले यश मिळू शकेल. कला व क्रीडा क्षेत्रात प्रयत्नांना खूप चांगले यश मिळेल. परदेशी शिक्षण घेण्यासाठीही हा कालावधी चांगला आहे. प्रयत्नांना चांगले यश मिळू शकते. त्यामुळे आपल्याला चांगले परिणाम मिळतील.
पारिवारिक : कुटुंबामध्ये काही वेळेस जास्तीच्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागण्याची शक्यता आहे, परंतु त्या जबाबदाऱ्या आपण यशस्वीरीत्या पार पाडू शकाल. कुटुंबातील मुला-मुलींसाठी विशेष खर्च होऊ शकतो. सध्याच्या कालावधीमध्ये काही महत्त्वाची कामे होतील. त्यासाठी वेळ व पैसा दोन्हीही खर्च होऊ शकतो. विशेषतः सरकारी स्वरूपाची कामे होतील. व्यवसाय, धंद्यातील उलाढाल वाढल्याकारणाने नफ्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे आपल्याला काम करण्याला उत्साह वाटेल. आत्मविश्वासामध्ये वृद्धी होईल. त्याचप्रमाणे नवीन गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. आपले नियोजन यशस्वी झाल्याने महत्त्वाची कामे आपण पार पाडू शकाल. सध्याचे कालावधी समाधान देईल.
नोकरी, व्यवसाय, धंदा : या महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपल्याला सकारात्मक घटना घटीत होताना अनुभवास येतील. आपल्या जीवनात स्थिरता येईल. आपल्या विचारात सकारात्मकता येऊन आपण अधिक चांगल्या प्रकारे आपले कार्य पूर्ण करू शकाल. रखडलेल्या कामांना गती देऊ शकाल. समाजातील गुरुतुल्य तसेच सन्माननीय व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल, तसेच त्यांची मदत मिळेल. या कालावधीमध्ये चढत्या क्रमाने शुभफळे मिळतील. आपण आपल्या कार्यक्षेत्रात नोकरी, व्यवसाय, धंद्यात प्रगती करू शकाल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विस्ताराच्या योजना आखू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांबरोबर चांगले नाते निर्माण होईल. तसेच त्यांचे सहकार्य मिळेल. परिवारातील सदस्यांचे वाढते सहकार्य समाधान देईल. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात रुची घ्यावीशी वाटेल. या कामांमध्ये सक्रिय योगदान देऊ शकाल. सहकुटुंब धार्मिक स्थळी भेट देऊ शकाल.
शुभ दिनांक: ४, ५, ७, ८, ९, २४, ३१
अशुभ दिनांक: १०, १२, १३, १४, १७, २२, २३, २५, २७
मीन
नैराश्य जाईल
मीन रास ही गुरूची रास आहे. म्हणजेच मीन राशीवर गुरूचे कारकत्व आहे. मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीन राशी जलतत्त्वाची रास आहे. राशीचक्रातील शेवटची म्हणजेच बारावी रास ही मीन रास आहे. मीन राशीचा भाव सम आहे. स्वभाव सौम्य आहे. या राशीचे लिंग स्त्री आहे. मीन रास ही द्विस्वभाव राशी आहे. उभयचरी रास असून नरादी संज्ञा जलचर आहे. ही रास बहुपद राशी आहे. मानवी शरीराचे पाय हा अवयव या राशीच्या कारकत्वाखाली येतो.
शिक्षण : गेल्या काही कालावधीमध्ये शिक्षण घेण्यामध्ये जी काही अडथळे येत होती ती आता दूर होतील, शिक्षणात उत्तम गती प्राप्त होईल. ग्रहमान चांगले आहे. अनुकूल आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्वच विभागांमध्ये आपण चांगल्या तऱ्हने शिक्षण घेऊ शकाल. परंतु अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतील. कंटाळा करू नये. इतरत्र वेळ वाया न घालवणे हे आपल्या हातात आहे. त्याचप्रमाणे खूप संगत टाळणे सुद्धा महत्त्वाचे ठरेल. अनुकूल ग्रहमानामुळे कला व क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्याला चांगल्या संधी मिळतील. त्याचे सोने करणे परदेशातील शिक्षणासाठी सुद्धा आपल्याला बाहेरून सहाय्य, मार्गदर्शन मिळू शकते. परिवारातून सुद्धा आपल्याला मदत होईल.
पारिवारिक : परिवारामध्ये आनंददायी आणि उत्साही वातावरणाचा लाभ मिळेल. घरातील वातावरण चांगले राहणार आहे, परंतु जास्त खर्च होण्याची शक्यता असल्याकारणाने आपल्याला आर्थिक नियोजनाची गरज भासू शकते. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कारणांसाठी अथवा धार्मिक कार्यासाठी खर्च होऊ शकतो. सहकुटुंब प्रवासासाठी खर्चाची शक्यता आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या जास्त प्रमाणात घ्याव्या लागल्यामुळे स्वभावामध्ये एक प्रकारची चिडचिड निर्माण होऊ शकते. योग्य संवाद साधल्यास मनाला शांतता मिळणार आहे व कुटुंबातही शांतता राहील. उत्पन्न चांगले असल्यामुळे आपण सर्वांच्या गरजा पूर्ण करू शकाल. फक्त वादविवाद टाळा.
नोकरी, व्यवसाय, धंदा : या कालावधीमध्ये कुटुंबातील वातावरण अतिशय अनुकूल राहील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न मिटतील. नोकरीविषयक प्रश्न अथवा समस्या संपतील जे जातक नोकरीच्या शोधात आहेत, अशा जातकांचा नोकरीचा शोध संपून नोकरी मिळू शकते. पूर्वी दिलेल्या मुलाखती यशस्वी होऊन नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. त्याचप्रमाणे कॉलेज कॅम्पसमधून नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी होतील. चालू नोकरीमध्ये नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. परदेशातूनही नोकरीविषयक संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी-विद्यार्थिनींना एखादे स्पर्धात्मक यश जीवन मार्गस्थ करेल. त्याचप्रमाणे कुटुंबातील तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. त्यांना आपला मनाजोगा साथीदार निवडता येईल. काहींचे ओळखीतून विवाह होण्याची शक्यता आहे. प्रेमामध्ये यश लाभेल.
शुभ दिनांक: ७, ८, ९, १५, १६, २०, २४, २९, ३०
अशुभ दिनांक: १०, १२, १३, १४, १७, २२, २३, २५, २७