मार्च महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे मार्च महिना? जाणून घ्या...
मार्च महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य
Published on

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

धनु

प्रश्न सुटतील

धनु राशि मध्ये मूळ पूर्वाशाढा व उत्तराशाढा शाळा ही नक्षत्रे येतात.धनु राशीतील मूळ नक्षत्राचा आराध्य वृक्ष राळ हा आहे या वृक्षाला सर्ज किंवा सालद्री असेही म्हणतात या वृक्षापासून मिळणारा चिक राळ म्हणून उपयोगात आणला जातो पोटात किंवा बाहेरून लावण्यासाठी राळे चा औषधासारखा उपयोग होतो या वृक्षाचे पान साल राळ मूळ जवळ ठेवल्यास मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सकारात्मकता येऊन प्रगती होते पूर्वाशाढा या नक्षत्राचा आराध्य वृक्ष वेत हा आहे. उत्तरा शाढा या नक्षत्राचा आराध्य वृक्ष फणस हा आहे फणसाच्या पानांचा औषधी गुण आहे आव अतिसार किंवा विषबाधा अशा अनेक रोगांवर हे औषध असते याचा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.

शिक्षण : शिक्षणासाठी ग्रहमान अनुकूल असले तरी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. परदेशासंबंधी शिक्षण घेण्यासाठी च्या प्रयत्नांना यशोदायक कालावधी आहे अनुकूलता मिळेल कला व क्रीडा क्षेत्रातील जातकांना योग्य संधी मिळेल आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल.

पारिवारिक : कुटुंब परिवारामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील त्यामुळे खर्चामध्ये वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे अतिरिक्त जबाबदारी स्वीकारावे लागतील कुटुंबातील मुला मुलींच्या साठी विशेष खर्च होऊ शकतो त्यांच्या शिक्षणासाठी खर्चाच्या बाबी पुढे येतील कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय होतील त्याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे उत्पन्न समाधानकारक आहे तरी खर्चाचे प्रमाण वाढलेली दिसेल त्यामुळे अनावश्यक खर्चाला कात्री लावावी घरामध्ये सुसंवाद व शांतता टिकण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : हा कालावधी अनुकूलतेने व्यापलेला असेल ज्या जातकांना नोकरी नाही अथवा जे जातक नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत अशा जातकांचा नोकरी विषयक शोध संपुष्टात येईल त्यांना नोकरी मिळू शकते.नोकरी विषयक दिलेल्या मुलाखती यशस्वी ठरतील चालू नोकरीमध्ये ज्या जातकांना बदल करावासा वाटत असेल त्यांनी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यास प्रयत्न मध्ये सफलता मिळू शकते कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या समस्या संपुष्टात येतील त्यांचेही नोकरी विषयक प्रश्न सुटतील त्याचप्रमाणे परदेशातूनही नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात या कामी ओळखी मध्यस्थीचा उपयोग होईल .विद्यार्थ्यांना परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेता येईल पूर्वार्धा मध्ये तरुण-तरुणींना अतिशय प्रेरक ग्रहमान लाभलेले आहे मित्रमंडळींच्या वर्तुळातून निरनिराळ्या प्रकारचे लाभ मिळू शकतात त्याचप्रमाणे काहींचे प्रेमविवाह होतील प्रेमविवाहातील अडसर दूर होऊन प्रेमविवाहाला मान्यता मिळू शकते सहकुटुंब सहपरिवार धार्मिक पवित्र स्थळी भेट देण्याचे योग घटित होत आहेत. कायदेशीर नियम अटी पाडूनच आपली कार्य आपण पूर्ण करा सरकारी नियम भंगातून त्रास होण्याची शक्यता त्यातच काही वेळेस गुप्त चिंता सतावू शकते परंतु आपण कार्यरत राहिल्याने ती जाईल.

शुभ दिनांक : ५, ७, १५, १९, २०, २६, ३०, ३१

अशुभ दिनांक : २, ३, ४, १०, ११, १७, १८, २२, २३

मार्च महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य
आजचे राशिभविष्य, ५ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मकर

व्यावसायिक महत्त्वाचे करार - मदार होतील.

मकर राशि मध्ये उत्तराशाढा श्रवण व धनिष्ठा ही नक्षत्रे येतात उत्तरा शाढा या नक्षत्राचा आराध्य वृक्ष फणस हा आहे फणसाच्या पानांचा रस अतिसार आव विषबाधा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो अर्थातच याचा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे जरुरी आहे. तसेच फणस या वृक्षाचे अनेक काही उपयोग आहेत औषधी उपयोग पण त्यात समाविष्ट आहेत फणसाचे गरे सर्वांना आवडतात फणसाच्या वृक्षाचे पान साल मूळ आढळी यांचा उपयोग बाळगल्याने होतो श्रवण नक्षत्राचा आराध्य वृक्ष रुई हा आहे या वृक्षाचे दुसरे नाव मंदार आहे या रुईच्या झाडांच्या पानाचा औषधी उपयोग होतो तसेच शनि महाराज व बजरंग बली ला सुद्धा रुईच्या पानांचे माळ घालतात रुईच्या झाडाचे पान फुल साल मूळ असे जवळ ठेवल्यास त्या नक्षत्राच्या जातकांना फायदा होतो सकारात्मकता वाढून प्रगतीपथावर वाटचाल होते धनिष्ठा नक्षत्राचा आराध्य वृक्ष शमी आहे.

शिक्षण : सध्याचा कालावधी शिक्षणासाठी अनुकूल आहे थोड्याच प्रयत त्यांनी यश प्राप्त होणार आहे त्यामुळे प्रयत्न कमी पडून देऊ नका शिवाय मार्गदर्शनही लाभेल कला व क्रीडा क्षेत्रातील जातकांना अपेक्षित यश प्राप्त होईल नवीन नवीन संधी मिळतील तांत्रिक क्षेत्रात चांगले यश प्राप्त करू शकाल परदेशी जाऊन शिक्षण घेण्याच्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल व नवीन संधी प्राप्त होतील योग्य दिशेने प्रयत्न केल्यास चांगले यश मिळू शकते.

पारिवारिक : कुटुंब परिवारातील वातावरण शांत व सकारात्मक ठेवण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न ची आवश्यकता आहे काही वेळेस कुटुंबातील सदस्यांच्या आपापसातील मतभेदांमुळे वातावरण बिघडू शकते व शांतता भंग होऊ शकते त्याचप्रमाणे घरामध्ये कामाचा ताणही जाड होईल प्रश्न चांगले सुटतील आपण पुढाकार घेणे आवश्यक राहील आपली भूमिका महत्त्वाची ठरेल योग्य ते निर्णय होणे गरजेचे ठरेल शांतपणे निर्णय घ्या घरात खर्चाचे प्रमाण वाढते असेल कुटुंब परिवारातील सर्वांसाठी व त्यांच्या आनंदासाठी आपण खर्च कराल या काळामध्ये आपल्या वाणीवर संयम ठेवणे जरुरी राहील.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : सध्याचा कालावधी आपल्या व्यवसाय धंद्यासाठी अनुकूल राहील आपल्या कार्यक्षेत्रात अथवा व्यवसाय धंद्यामध्ये शुभ वार्ता मिळतील व्यावसायिक महत्त्वाचे करार मदार करू शकाल नवीन व्यवसायासाठी भागीदारीच्या स्वरूपात विचारणा होऊ शकते तसेच चालू व्यवसाया मध्ये भागीदाराबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करा. भागीदाराचे निर्णय अचूक ठरून व्यवसायासाठी पोषक ठरू शकतात म्हणून भागीदाराच्या मताला उचित प्राधान्य देणे हितकारक ठरेल. व्यवसाय धंद्यामध्ये नवीन व्यावसायिक नाती तयार होतील त्याचप्रमाणे निरनिराळ्या सन्माननीय व व्यावसायिक दृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेटी होऊन व्यवसाय एक नवीन उंचीवर नेऊन ठेवण्यास प्रयत्नशील असाल. चालू नोकरीमध्ये अनपेक्षित काही चांगल्या घटना घडू शकतात वेतन वृद्धी अथवा पदोन्नती मिळेल.

शुभ दिनांक : १, ५, ७, १५, १९, २०, २६, ३०,३१

अशुभ दिनांक : २, ३, ४, १०, ११, १७, १८, २२,२३

logo
marathi.freepressjournal.in